Shiva Serial Off Air : मालिकाविश्वातील प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करण्यासाठी मराठी वाहिन्या नेहमीच नवनवीन कथानक घेऊन हे मनोरंजन सुरु ठेवण्याचं काम करतात. तर अशातच ‘झी-मराठी’ वाहिनीने नव्या मालिका प्रदर्शित होण्याची घोषणा करत साऱ्यांना सुखद धक्का दिला. जसे की ‘वीण दोघातली ही तुटेना’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या नव्या मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या मालिकांचे प्रोमो रसिक प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसले. पण नव्या मालिकांच्या स्वागतादरम्यान बहुतेक मालिका निरोप घेताना दिसल्या. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या वळणार आली आहे. ती मालिका म्हणजे ‘शिवा’.
‘शिवा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्याचसह कथानक आणि कलाकारांमुळे ही मालिका नेहमी चर्चेतही असायची. शिवा आणि आशु या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले. अशातच मालिकेतील शिवाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिकने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तिने तिच्या फॅनपेजची एक स्टोरी रिपोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिच्या फॅनपेजने मालिका बंद न करण्याची विनंती केली आहे.

पूर्वाने शेअर केलेल्या फॅनपेजच्या या स्टोरीमध्ये असं लिहिलं आहे की, “झी मराठी, कृपया शिवा मालिका संपवू नका, आम्हा सर्वांना ही मालिका खूप आवडते, आमचा संपूर्ण कुटुंब शिवा मालिका पाहतो. आम्ही एकही एपिसोड चुकवत नाही, शिवा मालिका खरोखरच अद्भुत आहे, लक्ष्मी निवास १ तासाचा आहे म्हणून तो फक्त अर्धा तास करा आणि अर्धा तास आमच्या शिवा मालिकेला द्या, कृपया आमच्या सर्व चाहत्यांची विनंती स्वीकारा आणि शिवा मालिकेचा टीआरपी देखील उत्तम आहे म्हणून ती संपवण्याचे कोणतेही कारण नाही. आमची मालिका संपवू नका ही नम्र विनंती आहे, कृपया तुम्हाला हवे असल्यास मालिकेची वेळ बदलू शकता”.
पूर्वाने फॅनपेजची ही पोस्ट शेअर केली आहे म्हणजे नक्कीच मालिका निरोप घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे. आणखी वाचा – “मी एकटाच लघवी प्यायलो म्हणून…”, स्वतःचीच लघवी पिण्यावरुन ट्रोल होताच परेश रावल स्पष्टच बोलले, म्हणाले, “उगाच वाढवून…”आणि पूर्वाच्या या स्टोरीवरुन मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. आता मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की, असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सुरु ठेवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.





