बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंह नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर मिकाने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. मात्र त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेला बघायला मिळाला आहे. तो त्याच्या विधानांमुळे अधिक चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. अनेकदा तो असे काही बोलून जातो ज्यामुळे तो अडकून जातो. २००६ साली मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमुळे खूप चर्चादेखील रंगल्या होत्या. या व्हिडिओमध्ये वाढदिवसांच्या दिवशी मिकाने राखी सावंतला कीस केले होते. राखी व मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (mika singh on rakhi sawant kiss in incedence)
मिका व राखीचा किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राखीने मिकाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता इतक्या वर्षांनी मिकाने या सगळ्या प्रकरणावर असलेले मौन सोडले आहे. मिकाने नुकताच ‘लल्लनटॉप’शी संवाद साधला. यामध्ये त्याने किस प्रकरणावर भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “माझा वाढदिवस होता. वाढदिवस काय असतो? हे मला माहीत पण नव्हतं. इथे पार्टी असायची. खूप सारे लोक यायचे. पीआरच्या माध्यमातून तुम्ही कोणालाही बोलावू शकता. राखीने मला केक लावण्याचा प्रयत्न केला. माझा कोणताही हेतू नव्हता. मी तिला पाहिलं तर ती गालावर किस करत होती”.
पुढे तो म्हणाला की, “मी किस नाही केलं. मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी ओठांवर हात ठेऊन किस केलं. राखी खुश होती. पण त्या घटणेनंतर माझे काही शत्रू होते त्यांनी राखीला माझ्या विरोधात जाऊन केस करण्यासाठी सांगितले. आम्ही तिला खूप समजावलंदेखील. नंतर २०२२ साली माझी ही केस संपली”.
नंतर तो म्हणाला की, “तसं या केसमध्ये काहीही नव्हतं. एक मित्र दुसऱ्या मित्राला किस करू शकतो. ही पूर्ण केस प्रेमानेच संपली. अनेकांना मिकाच्या विरोधात काहीतरी केस व्हावी असं वाटत असल्याचंही राखीने सांगितलं”. दरम्यान आता राखी व मिका एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर अनेकदा ते एकत्रित पाहिले जातात.