शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…अन् त्याने मला शाबासकी दिली”, ओंकार भोजनेने सांगितलेला गौरव मोरेचा ‘तो’ किस्सा, म्हणाला, “तो सिनियर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2023 | 9:01 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Onkar Bhojane On Gaurav More

"…अन् त्याने मला शाबासकी दिली", ओंकार भोजनेने सांगितलेला गौरव मोरेचा 'तो' किस्सा, म्हणाला, "तो सिनियर…"

बरेच कलाकार असे असतात जे त्यांच्या हास्यविनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या हास्यविरांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेले कलाकार ज्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे, असे कलाकार म्हणजे अभिनेता ओंकार भोजने व गौरव मोरे. ओंकार व गौरव यांच्या हास्यजत्रातील स्किट्सने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. आज जरी ओंकार हास्यजत्रेत नसला तरी त्याचे व गौरव मोरेचे स्किट्स आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. या दोनही कलाकारांनी त्यांच्यातील बॉण्डिंग, त्यांच्यातील मैत्री ही त्यांच्या अभिनयातून पडद्यावर उतरवली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. (Onkar Bhojane On Gaurav More)

गौरव व ओंकारच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली, गौरव मोरेचा ओंकार कसा फॅन झाला याबाबतचा किस्सा ओंकारने ‘रेडिओ सिटी मराठी’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. गौरव व तुझं बॉण्डिंग हे खूप उत्तम आहे, त्याबद्दल तू थोडक्यात काय सांगशील असा प्रश्न जेव्हा ओंकारला विचारला तेव्हा ओंकारने गौरवच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला. ओंकार म्हणाला की, “गौरव मला सिनियर आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा गट आहे त्यातली एक महत्वाची स्पर्धा म्हणजे सवाई एकांकिका. सवाईच्या रात्री मी ज्या दोन एकांकिका पाहायला गेलो होतो त्या माझ्या पाहून झाल्या होत्या”.

आणखी वाचा – “राजकारण आपल्या जागी पण…”, सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाला, “त्यांची तब्येत ठिक नव्हती तरी…”

“बऱ्यापैकी मी प्रवास करून आलो होतो त्यामुळे त्या बघून झाल्यावर मी पेंगलो. मध्यरात्री एका एकांकिकेसाठी खूप जास्त प्रेक्षक लोळून हसत होते. अगदी माझ्या शेजारच्या काकूही लोळून हसू लागल्या. त्या आवाजाने मी उठलो. आणि समोर नेमकं काय सुरु आहे हे मी पाहू लागलो, समोर सुरु होती ती एकांकिका होती ‘पडद्याआड’. आणि ही एकांकिका गौरव मोरे करत होता. त्यापुढचे तीस चाळीस मिनिट मी स्वतः अवाक होऊन ती एकांकिका पाहत होतो. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच नाट्यगृहाच्या बाहेर मी पुन्हा गौरवला भेटलो आणि त्याला म्हणालो, गेल्यावर्षी तुझी ही एकांकिका पाहिली होती. मला तेव्हापासून तुला भेटायचं होत, पण मला भेटता आलं नाही. त्याला त्यावेळी कळलं की, मी सुद्धा एकांकिका करतो. तेव्हा त्याने एकत्र काम करूया, भेटूया, असं म्हणून मला शाबासकी दिली”.

आणखी वाचा – “तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला”, आजोबांच्या निधनानंतर गौतमी देशपांडेची भावुक पोस्ट, म्हणाली, “स्वतःचे वडील जाण्यापासून…”

“त्यानंतर जेव्हा हास्यजत्रेच्या सेटवर आम्ही एकत्र स्किट करणार होतो, तेव्हा आम्ही विंगेत बोललो, “वो एक दिन था जब मैं आपके लिये आया था, और आज मैं आपके साथ हूँ” | त्यामुळे आमच्यात पहिल्या भेटीपासून विणलं गेलेलं नातं नंतर कामी येऊ लागलं. खरं सांगायचं तर आम्ही कामाशिवाय मित्र नाही आहोत, पण सगळ्यांना जे दिसत ते कामासाठी एकत्र आल्यावर अगदी खुलून येत.

Tags: fan momentgaurav moremaharashtrachi hasy jatramaharashtrachi hasya jatramhjonkar bhojane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Saie Tamhankar On Gautami Deshpande

गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरचं ठरलंय? सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “तेंडुलकरने देशपांडेंच्या मैदानावर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.