आपला आवडता कलाकार असेल तर त्याच्या बद्दलच्या सगळ्या बातम्या अगदी कां देऊन आपण ऐकतो. अशीच एक बातमी फिरत आहे ती म्हणजे अभिनेता ओंकार भोजने बद्दल. सोशल मीडिया वर नसला तरीही प्रेक्षकांच्या मनात पोहचण्यात ओंकार भोजने कुठेही कमी पडलेला दिसत नाही. महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी चित्रपट, फु बाई फु आणि आता करून गेलो गाव हे धमाल नाटक. या सर्व माध्यमांमधून ओंकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.(Onkar Bhojane Crush)
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसलेला ओंकार मात्र आता चर्चेत आहे ‘ती’ च्यासाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ओंकार सोबतची ती व्यक्ती म्हणजे रीलस्टार कोकणहार्टेड गर्ल अंकिता. काही दिवसांपूर्वी ओंकारने अंकिता ही त्याचूनि क्रश असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर या जोडीच्या चर्चा ही रंगल्या. आता अंकिताने स्वतः ओंकार सोबतचा फोटो पोस्ट करत ‘ “त्या” नंतर “ते” दोघं भेटले ????????????????’ असं कॅप्शन दिलं आहे. ओंकार आणि अंकिताच्या या पोस्ट वर अनेकांनी ‘आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।????❤️, Ya go dandyavarun navra kunachaaaa yetoooo , Aamchya mamala mami bhetli ki kay… अशा अनेक मजेशीर कमेंट्स देखील केलेल्या पाहायला मिळतायत.

परफेक्ट,अफलातून अभिनयाने ओंकारने समस्त प्रेक्षक वर्गाला वेड लावले. सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत पुन्हा सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता. याशिवाय ओंकारने नाटकविश्वातही चांगला ठसा उमटविला. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ओंकार एकामागोमाग एक चित्रपट करण्यात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.(Onkar Bhojane Crush)
हे देखील वाचा- ‘चाहत्यांच्या गर्दीत रमले मामा,पण पाकीट गेलं चोरीला’तरी पाकीट चोरणाऱ्याची अशी झाली होती फजिती……