मराठी चित्रपट, मालिकाविश्व यामधून आता प्रेक्षकांनी रंगमंचावरील मनोरंजनाकडे आपली पावलं वळविली आहेत. नाटक म्हटलं की, प्रत्यक्षात हुबेहूब अभिनय समोर पाहायला मिळणार याच अधिक आणि विशेष कौतुक असत. रंगमंचावरून या कलाकार मंडळींनी आपल्या सिनेविश्वातल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, याच रंगमंचाकडे प्रेक्षकवर्ग पुन्हा एकदा जोमाने प्रतिसाद देताना दिसतोय. सध्या रंगमंचावर गाजत असलेली आणि या नाटकांपैकी कोणती नाटक आवर्जून पाहावीत याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत.(Marathi Famous Drama)
सध्या नियम व अटी लागू या नाटकाची जोरदार चर्चा सुरु आहे. रंगमंचावर गाजणाऱ्या नाटकांपैकी हे एक नाटक होय. प्रशांत दामले निर्मित तरुण जोडप्याची गोष्ट सांगणार हे नाटक आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख, प्रसाद बर्वे हे कलाकार पाहायला मिळत आहेत.
जाणून घ्या गाजणाऱ्या या नाटकांबद्दल थोडक्यात (Marathi Famous Drama)
तर करून गेलो गाव, या कोकणी भाषेतील नाटकातून दोन अस्सल मातीतल्या विनोदवीरांची जोडी पाहायला मिळते आहे. यांत ओंकार भोजने आणि भाऊ कदम ही जोडी पाहायला मिळतेय. छोट्या पडद्यावर विनोदाच्या अफलातून टायमिंगनं सर्वांना हसवणारा कोकण कोहिनूर अर्थात अभिनेता ओंकार भोजनेने या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. या नाटकाची निर्मिती ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे एकत्रित करत आहेत. तर नाटकाचं लेखन-दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे.(Marathi Famous Drama)
हे देखील वाचा – ४८ वर्षापासूनच एकच अंगठी का आहे अशोक मामांच्या हातात
३१ वर्षांपूर्वी गाजलेलं चारचौघी हे नाटक नव्याने रंगभूमी गाजवतंय, बाई पणाची चौकट भेदून स्त्रियांची मुक्तता, स्वातंत्र्य आणि बंडखोरपणा यावर निर्भीड भाष्य करणारे एक वादळी नाटक १९९१ रोजी रंगभूमीवर आलं होत. 31 वर्षांपूर्वी वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या. तर आता या नाटकांत रोहिणी हट्टंगडी, मुक्त बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
मूळ गुजराती सफरचन हे नाटक लेखिका स्नेहा देसाई व दिग्दर्शक राजेश जोशी यांनी सफरचंद म्हणून मराठीत आणले. पडदा उघडल्यापासून पडेपर्यंत हे नाटक आपल्याला काश्मीरच्या वातावरणात तेथील भावविश्वात गुंतून ठेवते. या नाटकांत शंतनू मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, अमित तळवडेकर, रुपेश खरे, अक्षय वर्तक यांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहेत.(Marathi Famous Drama)
तर सध्या रंगभूमीवर गाजत असलेली ही नाटक आहेत आणि ही नाटक तुम्ही आवर्जून पाहावीत.