कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार भोजनेने ही त्याची क्रश कोण आहे याबाबत उलगडा केला. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, तुझी क्रश कोण आहे, तेव्हा त्याने कोणत्याही बड्या सेलिब्रिटींचे नाव न घेता एका रीलस्टारच नाव घेतलं.(Onkar Bhojane Ankita Walavalkar)
ओंकार म्हणाला की, ‘क्रश अशी नाही कुणी पण मला कोकणहार्टेडगर्ल आवडते. तिचा स्वभाव खूप आवडतो, ती ज्याप्रकारे काही सामाजिक मुद्दे उचलून धरते आणि त्या प्रकरणांवर बोलते, त्यामुळे तिला फॉलो करायला मला आवडतं.’ असं बोलल्यापासून ओंकार आणि अंकिता यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.
पाहा नेटकऱ्यांनी का घातलाय ओंकारच्या नावाचा कल्ला (Onkar Bhojane Ankita Walavalkar)
यातच भर घालत अंकिताने नुकताच एक हळदी समारंभादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या फोटोपेक्षा तिच्या फोटोवरील कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अंकिताने हळदी समारंभातील नटून थाटून एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोवर नेटकऱ्यानी ओंकारच्या नावाने कमेंट करत कल्ला केला आहे. हा फोटो पाहून कित्येकांना वाटलं असेल की, ही अंकिताची हळद आहे पण हा गैरसमज अंकिताने दिलेल्या कॅप्शननेच दूर झाला आहे. फोटोखाली तिने जर ही खरंच माझी हळद असती तर ? अशी कमेंट केली आहे. पण ज्यांनी कामनेत वाचाल नाहीय त्यांना अंकिता खर्च लग्न करतेय का असं नक्की वाटू शकत.(Onkar Bhojane Ankita Walavalkar)
हे देखील वाचा – हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?
अंकिताच्या या फोटोखाली नेटकाऱ्यानी कमेंट करत ओंकारच्या नाव घेतलंय. एका नेटकाऱ्याने कमेंट केली की, ‘ ओंकार भोजने कुठे आहे?’ तर दुसऱ्या एकाने असेही विचारले की, ‘नवरोबाचे कान पिळायला ओंकार येणार आहे का?’ एकाने मुन्नाभाई एमबीबीएस मधला डायलॉग कमेंटमध्ये लिहित म्हटले की, ‘ओंकार भोजने म्हणेल – उस रात अपून दो बजे तक पिया…’,(Onkar Bhojane Ankita Walavalkar)
अंकिता आणि ओंकार यांनी भेट देखील घेतली होती. त्यांच्या भेटीचा फोटो अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता, त्याखाली अंकिताने “आणि त्यानंतर आम्ही भेटलो” असं कॅप्शन दिल होत. या फोटोंनंतर अंकिता आणि ओंकार यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण देखील आलं होत.
