अभिनेत्री क्रांती रेडकरचा पती आणि एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे यांनी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या अनेक कलाकारांविरोधात कारवाई केली आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे आणि त्यानंतर हे प्रकरण वेगवेगळ्या वळणावर गेलेले दिसते.या प्रकरणासंबंधित एका मागून एक अशा नवं नवीन गोष्टी समोर येतच असतात.(Hindustani Bhau Sameer Wankhede)
विकास पाठक म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ हा त्याच्या वादग्रस्त आणि परखड मतांमुळे कायमच चर्चेत असतो.सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊंची एक वेगळी क्रेज पाहायला मिळते.त्याच्या व्यक्तिमत्वामुळे त्याला सपोर्ट करणारे अनेक लोक पाहायला मिळतात.समाजातील त्याला पटणाऱ्या अनेक गोष्टींना तो त्याचा सपोर्ट दाखवतो तर न पटणाऱ्या गोष्टींना रोकठोक नकार देतो.
पाहा काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?(Hindustani Bhau Sameer Wankhede)
सध्या हिंदुस्थानी भाऊने त्याचा हा पाठिंबा समीर वानखेडेच्या बाजूने दाखवला आहे. समीर सोबतच एक फोटो आणि व्हिडिओ हिंदुस्थानी भाऊने शेअर केला आहे.समीर वानखेडे सर जय हिंद असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिल आहे.समीर वानखेडे ने केलेल्या कामाबद्दल हिंदुस्थानी भाऊने त्याच्या भाषेत कौतुक केलं आहे.(Hindustani Bhau Sameer Wankhede)
अभिनेत्री क्रांती रेडकरने देखील या प्रकरणाबद्दल उघड उघड भाष्य केले आहे. याबाबतचे क्रांतीचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते.जेव्हा जवळची व्यक्ती संकटात अडकते. तेव्हा मदतीसाठी जे हात पुढे करतात,पाठींबा देतात ते खरे आपले असतात.अशी सामान्य समजूत आहे.आणि हिंदुस्थानी भाऊने समीरला केलेला हा पाठिंबा आपुलकीची भावना निर्माण करणारा आहे.
हे देखील वाचा : आजीसारखं क्रिकेटरसोबत लग्न करणार का? लग्नबाबत सारा अली खान झाली व्यक्त