Nora Fatehi Shared Incident : नोरा फतेही ही एक अभिनेत्री व उत्तम नृत्यांगना असून तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंगवर थिरकत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘सत्यमेव जयते’ या ॲक्शन चित्रपटामध्ये तिने ‘दिलबर’ या गाण्यात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. प्रेक्षक तिच्या नृत्याने खूप प्रभावित झाले होते, मात्र प्रॉडक्शन टीमने बनवलेला ब्लाउज पाहून नोराला थोडा धक्काच बसला. त्यामुळे तिने त्याविरोधात आवाज उठवला आणि तो ब्लाउज बदलून घेतला.
मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये, नोरा फतेहीने ‘दिलबर’ या ट्रेंडिंग गाण्यात शॉर्ट ड्रेस परिधान करण्याला विरोध केल्याची आठवण करुन दिली. कार्यक्रमादरम्यान, तिने सांगितले की ‘सत्यमेव जयते’ च्या प्रॉडक्शन टीमला नवीन ब्लाउज बनवावा लागला कारण त्यांनी तिच्यासाठी आणलेला ब्लाउज खूपच लहान होता आणि त्यामुळे वेगळा ब्लाउज तिला मागवावा लागला. तोकडा ब्लाउज परिधान करु शकत नसल्याचे तिने तिच्या टीमला सांगितले.
आणखी वाचा – “बारामतीची सून”, वैभव चव्हाणसह इरिनाचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “फॉरेनची पाटलीण…”
यावेळी नोरा म्हणाली, “मला खूप मोहक बनवू नका. मला समजलं आहे की, हे एक सेक्सी गाणे आहे. आपल्या सर्वांना माहित आहे परंतु आपण याबद्दल असभ्य असण्याची गरज नाही”. तिने या ॲक्शन-थ्रिलरच्या निर्मात्यांना सांगितले की त्यावेळी देखील रमजान होता. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी अनेक पार्ट्यांमध्ये याविषयी तिची खिल्ली उडवतात. या घटनेची आठवण करुन देताना तिने सांगितले की, ‘सुरुवातीला तिने तिच्यासाठी बनवलेले कपडे घालण्यास नकार दिला तेव्हा तिला पूर्ण ब्लाउज पुन्हा शिवावा लागला.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मुळे विकी कौशलला भिती, ‘छावा’ चित्रपटाची माघार, प्रदर्शन पुढे ढकलले
मात्र, गाण्यातल्या सौंदर्यामुळे तिला पोट दाखवायला हरकत नव्हती पण ती फारशी क्लीवेज दाखवू शकली नाही. मात्र, त्यावेळी तिथे कोणीच नसल्याने ते खूप अवघड होते’, असेही नोरा म्हणाली. तक्रार केल्यावर चित्रपट निर्माते ‘तु स्वतःला काय समजतेस?’ असाही सवाल करू शकले असते. सुदैवाने, जेव्हा त्यांनी मिलापशी याबद्दल बोललं तेव्हा त्यांनी ब्लाउजमुळे ट्रॅकचे संगीत व कोरिओग्राफी खराब झाली पाहिले म्हणून मला हव्या तशा कपड्यांना मान्यता दिली.