बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी छावा या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटातून विकी कौशल कधीही न पाहिलेल्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘छावा’ या चित्रपटामध्ये विकी कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील त्याची वेशभूषा समोर आली होती. तेव्हापासून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर आलेल्या टीझरने ही उत्सुकता आणखीन वाढवली. (Chhaava Movie Release Postponed)
छावा चित्रपटाचा टीझर समोर आला तेव्हा हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तर ‘छावा’च्या प्रदर्शनाची तारीख ६ डिसेंबर आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार असून हा संघर्ष टाळण्यासाठी ‘छावा’च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले जात आहे.
डिसेंबर महिन्यातील प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे छावा हा चित्रपट आता पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटलं जात आहे. अर्थात ‘छावा’च्या निर्मात्यांकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण छावा चित्रपटाच्या चांगल्या कलेक्शनसाठी हा इतर कोणत्या चित्रपटाबरोबर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही. त्यामुळे आता विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता विकीचे अनेक चाहते त्याच्या आगामी ‘छावा’ प्रदर्शनाकडे आस लावून बसलेले आहेत.
दरम्यान, मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे, ज्यात छत्रपती शिवरायांचे शूर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आणि संघर्ष याबद्दल सांगितले आहे. विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटात विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. विकी आणि रश्मिका व्यतिरिक्त, दिव्या दत्ता सोयराबईंची भूमिका साकारत आहे. तसंच अक्षय खन्ना औरंगजेबची भूमिका साकारत आहे.