कलाकारांचे अनेक फॅन्स असतात आणि आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणं हे फॅन्सच स्वप्नच असत. आणि कलाकारांनाही त्यांच्या विशेष अशा फॅनमोमेन्ट कायम लक्षात राहतात. पण आपले हे कलाकार देखील इतर कलाकारांचे फॅन्स असतात आणि त्यांच्यासाठी देखील या फॅन मोमेन्ट खास असतात.अशीच एक फॅन मोमेन्ट अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी शेअर केली आहे. (Nivedita Saraf Johnny Lever)
पहा निवेदिता यांची खास फॅन मोमेंट (Nivedita Saraf Johnny Lever)
त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून अभिनेता जॉनी लिव्हर यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्यासाठी हा क्षण खूप खास आहे. निवेदिता सराफ यांचं, मी स्वरा आणि ते दोघ हे नाटक रंगमंचावर जोरदार सुरु आहे. आणि त्यांचं हेच नाटक बघयाला जॉनी लिव्हर आले होते तेव्हाचा हा फोटो आहे.माझ्या साठी ही खूप मोठी फॅन मोमेन्ट आहे. माझे आवडते अभिनेते आणि माणूस जॉनी भाई हे माझं, मी स्वर आणि ते दोघ हे नाटक पहायला आले होते. तेव्हा, त्यांनी नाटकाचं आणि माझ्या कामच कौतुक केलं. असं कॅप्शन या फोटोला दिल आहे.(Nivedita Saraf Johnny Lever)
मी स्वरा आणि ते दोघ हे नाटक प्रेक्षकांना प्रेम या भावनेकडे बघण्याचं वेगळं दृष्टिकोन देत. अंडी त्यातील मंजुषा ही निवेदिता सराफ यांची भूमिका बरच काही शिकवून जाते. आयुष्याच्या या टप्यावर लागणारी साथ त्याकडे कस पाहावं हे मंजुषा या पात्राकडून शिकण्या सारखं आहे. निवेदिता कायमच त्यांच्या वाट्याला आलेल्या भुमीकांचं सोनंच करतात. त्या पात्राला अगदी त्या आपलस करतात. म्हणून आज ही मालिका, चित्रपट नाटक या सर्व माध्यमांत त्या तितक्याच ताकदीने काम करताना पहायला मिळतात.
हे देखील वाचा : शेफ होण्याआधी मामांचा मुलगा करत होता ‘हे’ काम
आपल्या आवडत्या कलाकारांना आपलं काम आवडणं, त्यांनी स्वतः त्या कामाची दखल घेणं आणि त्याच कौतुक करणं हे आपल्या कामाचं चीज झाल्या सारखंच असत. असच निवेदिता यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढ कमीच आहे. आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात.सध्या निवेदिता कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.(Nivedita Saraf Johnny Lever)