बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आमिर खानने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेता बरेचदा अभिनयाशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अशातच आता आमिर व त्याची पूर्वाश्रमीची पहिली पत्नी रिना दत्ता चर्चेत आले आहेत. प्रसूतीदरम्यान त्याची पहिली पत्नी रीना दत्ताने त्याला लेबर रूममध्ये कानाखाली मारल्याचा खुलासा स्वतः आमिर खानने केला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये आमिर खान पहिल्यांदाच दिसणार आहे. या कॉमेडी शोच्या भागात त्याने गमतीशीर गोष्ट सांगितली. (Aamir Khan and Reena Dutta)
अभिनेत्याने हा किस्सा सांगत म्हटलं की, प्रसूती वेदना होत असताना, तो त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना हिला श्वासोच्छवासाचे व्यायाम शिकवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी तिने जोरात त्याच्या कानाखाली मारली. असाच सीन आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट’मध्ये एक सीन आहे ज्यामध्ये मोना सिंग डिलिव्हरी करणार असताना ती आमिर खानला कानाखाली मारते.
कपिल शर्माने आमिरला विचारले होते की, एक अभिनेता म्हणून तो कधी लोकांच्या वागण्याकडे लक्ष देतो का?, यावर आमिर म्हणाला, “मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. जुनैदचा (आमिरचा मोठा मुलगा) जन्म झाला त्या दिवशीची ही घटना आहे. रीनाला प्रसूती वेदना होत होत्या. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये होतो. एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे मी तिला श्वासोच्छवासाचा व्यायाम करून दाखवत होतो, पण जेव्हा प्रसूती वेदना खूप वाढली तेव्हा रीनाने मला हा मूर्खपणा करू नकोस असं सांगत कानाखाली मारली. तिला इतक्या वेदना होत होत्या की, तिने माझा हातही चावला”.
आमिर म्हणाला की, “आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत असतो. नंतर मला समजले की एक व्यक्ती म्ह्णयुन तिला या वेदना असह्य होत होत्या. बाळंतपणात महिलांना यातून जावे लागते. नंतर मी हे रीनालाही सांगितले”. रीना व आमिरच्या लग्नाच्या १६ वर्षानंतर घटस्फोट झाला. आमिर खानला पहिल्या पत्नीपासून जुनैद व आयरा ही दोन मुले आहेत. आमिरने किरण रावशी दुसरे लग्न केले आणि लग्नाच्या १५ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. किरण व आमिर यांना एक मुलगा असून त्याचं नाव आझाद आहे. आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता ज्याने बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी केली नाही.