प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक व्यक्ती किंवा एकदा प्राणी हा जवळचा असतोच. आज जवळपास प्रत्येक जण हा प्राणी प्रेमी झाला आहे. आणि अश्या मूक प्राण्यावर अनेक कलाकार देखील प्रेम व्यक्त करतात.यातीलच निवेदिता सराफ देखील एक आहे. निवेदिता सराफ यांच्या घरी एक पेट आहे. टोपण नाव सनी आहे. सनी त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. म्हणून निवेदिता सराफ नेहमी त्यांच्या सोबतच नेहमी फोटो व्हिडीओ शेअर करतात. काल त्याच्या वाढदिवसानिमित्त देखील निवेदिता सराफ यांनी खास पोस्ट केली होती. सर्व अश्यातच त्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केलाय.(nivedita saraf pet)

निवेदिता सराफ प्राण्यांनवर खूप प्रेम करतात हे सगळेच जण जाणून आहेत.अश्यातच त्यांनी सनीच्या वाढदिवसाचा एक फोटो शेअर केला. या फोटोत निवेदिता सराफ,अशोक सराफ आणि सनी पाहायला मिळतात. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी डोक्यात टोपी आणि घरी खास डेकोरेशन केलेलं दिसतं.यावरूनच अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलेला दिसतोय. तसेच फोटो शेअर करत, It was fun yesterday impromptu birthday पार्टी असं म्हटलंय. यात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबतच सनी देखील खूपच आंनदी दिसतोय. तर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरला असून अनेकांनी किती गोड असं म्हणत सनीला शुभेच्छा दिल्यात.
हे देखील वाचा: अनघा वाचवू शकेल का अभिचा जीव ?
कालदेखील निवेदिता सराफ यांनी सनीसाठी खास पोस्ट केली. त्यांनी सनीसोबतचे काही खास क्षणाचे फोटो त्यांनी शेअर केले.यासोबतच प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, रिंकू राजगुरू, भाऊ कदम अश्या अनेक कलाकारांकडे पेट असलेले पाहायला मिळतात.(nivedita saraf pet)
