या जगात कोणालाही एखाद्या नवीन ठिकाणी स्वतःचे स्थान निर्मांण करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, परंतु एकदा का तुम्ही त्या ठिकाणी स्वतःची जागा निर्माण केली, तर पुढे सगळं सहज, आणि सोप्प वाटू लागत, आजूबाजूचं वातावरण आवडू लागत, परंतु त्या आधीच्या परिस्थितीला सामोरं जाणं थोडं कठीणच असतं. असंच काहीस सांगणारा एक किस्सा बॉलीवूड आणि सोबतच हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियांका चोपडाने सांगितला आहे. (Priyanka Chopra Secret)
बॉलिवूड मध्ये “देसी गर्ल” या नावाने प्रियांका चोपडा ओळखली जाते. प्रियंकाने आज वर बॉलीवूड मध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. आज जरी प्रियंकाने यशाचे उंच शिखर गाठले असले, तरी सुद्धा या बॉलीवूड मध्ये स्वतःचे स्थान प्रस्थापित करायला प्रियंकाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. इतेच नाही परंतु, प्रियांका शिक्षणासाठी बाहेर गावी असताना सुद्धा तिला त्या लोकांमध्ये रुजण्यासाठी खूप वेळ लागला, या दरम्यानचा एक किस्सा प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितला आहे.
हे देखील वाचा: ‘सांगलीची जेनिफर लॉरेन्स’..,सईच्या फोटोवर चाहत्यांची मजेशीर कमेंट
प्रियांका चोपडा सध्या “सिटाटेल” नावाच्या वेब सिरीजमध्ये काम करत असून, या निमित्ताने प्रियंकाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान प्रियंकाने तिच्या हायस्कुल मधील एक किस्सा सांगितला होता.
प्रियांका जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेली होती, तेव्हा ती प्रचंड दडपणाखाली होती. तिच्या साठी आजूबाजूचं वातावरण भीतीदायक वाटायचं. प्रियंकाला असं वाटायचं आपण तिकडच्या लोकांमध्ये फिट बसत नाही आहोत. त्यामुळे प्रियांका चक्क बाथरूम मध्ये बसून तीच लंच करायची. जवळजवळ सुरुवातीचे ४ ते ८ आठवडे प्रियंकाने बाथरूमध्ये बसूनच जेवण केलं होतं. त्याकाळात प्रियंकाकडे एवढा कॉन्फिडन्स नसल्याचं तिने सांगितलं होतं. परंतु आता प्रियांकाचा अभिनयासोबतच तिच्या भाषणात देखील तिचा हात कोणी पकडू शकत नाही. (Priyanka Chopra Secret)
हे देखील वाचा : जिया खान आत्महत्या प्रकरणाचा १० वर्षांनी निकाल बॉयफ्रेंड सूरज पांचोलीची निर्दोष सुटका
प्रियंकाने आता बॉलीवूड सोबतच हॉलिवूडमध्ये सुद्धा तिचे स्थान निर्माण केले आहे. इतकंच नाही तर प्रियंकाने अमेरिकेतील प्रसिद्ध गायक निक जॉनस याच्या सोबत लग्नगाठ देखील बांधली असून, प्रियांका आता अमेरिकेची सून झाली आहे. एके काळी प्रियांका साठी नवीन असलेली अमेरिका आता तिला तिच्या नावाने ओळखत आहे.