शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काही दु:ख सांगता येत नाहीत”, निवेदिता सराफ यांची हृदयाला स्पर्श करणारी कविता, म्हणाल्या, “बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 29, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Nivedita Saraf performed a poem by Rohini Ninave at the book launch event

“काही दु:ख सांगता येत नाहीत”, निवेदिता सराफ यांची हृदयाला स्पर्श करणारी कविता, म्हणाल्या, “बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय...”

कविता… अनेकांच्या अगदी काळजातला विषय. प्रत्येकाच्या मनात अनेक विचार सुरुच असतात. जो ते विचार कवितेत व्यक्त करतो तो कवी होतो. कविता ही वैयक्तिक बाब आहे. ती स्वतःसाठी लिहीलेली असते. पण त्या कवितेत साऱ्यांवर परिणाम साधण्याची शक्ती असते आणि  आपल्या कवितांमधून असाच परिणाम साधण्याची शक्ती असते ती कवयित्री यांच्या कवितेत.  गेली २७ वर्ष हिंदीसह मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात लेखनाची मुशाफिरी करणाऱ्या आणि  १२ हजारांपेक्षा जास्त मालिकांच्या भागांचे लिखाण करणाऱ्या रोहिणी निनावे यांच्या ‘सातवा ऋतू’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले.

‘सातवा ऋतू’ हा रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. नुकतंच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कारण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  कवी-लेखक विश्वास पाटील, कवी अरुण म्हात्रे, अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ, अभिनेता सुबोध भावे यांची उपस्थिती लाभली. यावेळी निवेदिता सराफ यांनी रोहिनींची एक कविता सादर केली. या कवितेचे नाव होते. “आयुष्य तसं ठीक चाललंय”

आजकाल सकाळी उठल्यावर मला पाहिल्यावर आरसा हसत नाही,

नुसतं हसल्याने काय आनंद मिळत नाही, हे आता आरशालाही कळलं आहे,

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

म्हटलं तर हमसून रडावं असं काही नाही,

हिरीरीने आयुष्याला भिडावं असं काही नाही,

आयुष्यात काहीच मिळवलं नाही असंही नाही,

पण आता सुक्याबरोबर ओलंही जळलंय,  

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

तशी त्याला आवडते वगैरे म्हणे मी,

करतो सोशल मीडियावर माझे स्तुती बिती,

होतात आमच्या वर्षातनं चार भेटी,

असंही नाही की मी रोज भेटत नाही म्हणून त्याचं काही बिघडलंय,

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

मी कधी कुणाच्या मागे लागत नाही,

कुणी माझ्या मागे लागलेलं मला आवडतही नाही,

पण त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे त्याने फिरत रहावं,

असं माझं आणि सुखाचं बहुदा ठरलंय,

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

तसे ओळखतात चार लोक मला,

अगदीच काही केलं नाही आयुष्यात असं नाही,

पण कुणी मागे धावत येईल,

माझ्यावर जीव ओवाळून टाकावं, तसंही नाही,

त्या चांदण्या, तो बहर, मोरपीस वगैरे,

जुन्या पुस्तकाच्या पिवळ्या पानात उरलंय,

मधाच्या फांदीवर एक स्वप्न उगवलं होतं,

ते तुझ्या वाटेवर पुरलंय,  

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

आणखी वाचा – लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोणने घेतला आई होण्याचा निर्णय, मराठी कलाकारांकडून कौतुक, रणवीर सिंगचाही केला उल्लेख, म्हणाले…

काही दु:ख सांगता येत नाहीत, मनातही ठेवता येत नाहीत,

एखाद्या लव्हाळीसारखं रुतंत राहतं,

अश्वत्थामाच्या जखमेसारखं आयुष्यभर कपाळावर सलत राहतं,

कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

आणखी वाचा – “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत…”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

निवेदिता यांनी हे कविता सादर करताच अनेकांनी त्यांच्या कविता सादरीकरणाचे कौतुक केले. तसेच “स्त्रीच्या अंतरमनातील भावना रोहिणी खूप चांगल्या प्रकारे  मांडते,” अशी भावनाही निवेदिता यांनी व्यक्त केली.

Tags: marathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsMarathi PoetMarathi Poetrynivedita sarafRohini Ninaveनिवेदिता सराफमराठी अभिनेत्रीमराठी कवयित्रीमराठी कवितामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीरोहिणी निनावे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Sameer wankhede talking about Aryan khan drugs case see the details

“माझ्यासाठी डॉ . बाबासाहेब आंबडेकरच सेलिब्रिटी”, शाहरुख खानवरुन समीर वानखेडेंचं पुन्हा एकदा वक्तव्य म्हणाले, “ड्रग्ज आणि त्याचं व्यसन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.