एखाद नातं जेवढं चित्रपटात, मालिकेत, नाटकांमध्ये घट्ट दाखवलं जातात ते खऱ्या आयुष्यात देखील कुठे तरी पडद्यावरील नात्यानं साजेस बनत. कलाकारांना एकमेकासाची सवय लागते. मैत्री होते. नवीन भावनिक बंध जोडले जातात. मग पडद्यावरची ती नाती भाऊ बहीण, आई बाबा, आई आणि मुलगा किंवा मुलगी आणि बाबा अशी असली तर कलाकारानंसोबतच्या ऑफस्क्रीन बॉंड मध्ये देखील त्यामधला जिव्हाळा, आपुलकी, प्रेम कुठे तरी मुरलेलं असतंच.(Ashutosh Patki Nivedita Saraf)

मालिका, चित्रपट संपला तरी ही त्यातील नाती मात्र अजरामर राहतात. आणि जेव्हा भेटतात तेव्हा जुन्या आठवणी नक्की ताज्या होतात. अशीच एक ताजी आठवण शेअर केली आहे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी. निवेदिता यांनी काही काळापूर्वी झी मराठी वरील अग्ग बाई सासूबाई या मालिकेत आईच पात्र साकारलं होत या मालिकेत यांच्या सोबत अभिनेता आशुतोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी देखील मुलगा आणि सून हे पात्र साकारलं होत. मालिकेत निवेदिता आपल्या मुलाला म्हणजेच आशुतोषला ‘बबड्या’ या नावाने आवाज द्यायच्या आणि हेच बबड्या नाव पुढे प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिलं.
हे देखील वाचा – ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
रंगभूमीवर सुरु असलेलं निवेदिता यांचं मी स्वरा आणि ते दोघे हे नाटक चांगलंच गाजतंय.या नाटकात निवेदिता यांच्या सोबत सुयश टिळक, रश्मी अनपट, विजय पटवर्धन हे कलाकार देखील आहेत. या नाटकाच्या एका प्रयोगाला आशुतोष ने हजेरी लावली होती. माय लेकाच्या या भेटीचा फोटो निवेदिता यांनी पोस्ट केला आहे. तर बबड्या आणि आईच्या या फोटोवर प्रेक्षकांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. मालिकेत जरी बबड्या आईला त्रास देणारा असला तरी अनेक मजेशीर मिम्स या पात्रावर बनवण्यात आले. बबड्याला बऱ्याच वेळा ट्रॉलिंगचा सामना देखील करावा लागला होता.(Ashutosh Patki Nivedita Saraf)