सामान्य माणूस असो किंवा एखादं प्रसिद्ध व्यक्तिमत्तव स्वतःच घर घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असत. आपल्या मेहनतीने, कष्टाने प्रत्येकजण आपलं हे स्वप्न पूर्ण करत असतो. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय अभिनेत्री मानसी नाईकचं. मराठी चित्रपट सृष्टीत सुरुवातीला नृत्यांगना, अभिनेत्री असलेली मानसी रिक्षावाला या गाण्यामुळे घरा घरात पोहचली.(Mansi Naik new home)
मानसी आणि तिचा नवरा प्रदीप यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय होता पण त्यानंतर आता मानसीने एक आनंदाची बातमी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. मानसीने तीच स्वतःच नवीन घर घेऊन त्या घरातरील पूजेचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकॉऊंट वरून पोस्ट केलाय. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये मानसीने ने ‘प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं या रखरखीच्या जगण्यात वावरतांना उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं Majhi ऊर्जा स्थान बनले Majhe नवीन घर मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर संस्कारांची शिदोरी असते एक घर MAJHE घर’. असं लिहीत नवीन घराची बातमी चाहत्यांना सोबत शेअर केली आहे.(Mansi Naik new home)
सोबतच मानसीने नवीन घरातील आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती स्वयंपाक करताना दिसते तर व्हिडिओ दिलेल्या कॅप्शन ने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलेलं दिसतंय या व्हिडिओला ‘मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं कधी कधी मुली तुमच्या कडे बघून पण हसतात’ असं खुमासदार कॅप्शन दिलंय. मानसी अनेक चित्रपट, गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्याला दिसते.