रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा नवराच खोटा आणि…”, गंभीर आरोपांनंतर ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या पत्नीने सत्य आणलं समोर, म्हणाली, “त्यांचा दावा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 19, 2024 | 7:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Smita on Nitish Bhardwaj

"माझा नवराच खोटा आणि...", गंभीर आरोपांनंतर 'महाभारत' फेम नितीश भारद्वाज यांच्या पत्नीने सत्य आणलं समोर, म्हणाली, "त्यांचा दावा..."

महाभारत’ मालिकेमध्ये ‘कृष्णा’ची भूमिकेमुळे नीतिश भारद्वाज घराघरांत पोहोचले. सध्या नीतिश त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. ते बरेच त्रस्त असून त्यांनी त्यांच्या IAS पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. भोपाळ येथील पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी स्मिताविरोधात तक्रार दाखल केली. नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता गटे यांच्यावर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप लावला. तसेच ती आपल्याला जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचा दावाही भारद्वाज यांनी केला. आता या प्रकरणात नीतिश यांच्या पत्नी स्मिता यांची बाजूदेखील समोर आली आहे. स्मिता यांनी कायदेशीररित्या जबाब दिला आहे. (Smita on Nitish Bhardwaj)

स्मिताने सांगिले की, “मी स्मिता भारद्वाज, नितीश भारद्वाज यांची पत्नी. माझ्या मुलींच्या सुरक्षेसाठी मला आरोपांवर उत्तर देणं गरजेचं होतं. तसेच माझे पती खोटे भाष्य करत आहेत आणि सतत माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. तसेच माध्यमांमध्येही चुकीची माहिती देत आहेत. माझ्या मुलींच्या अपहरणाबद्दलही खोटी माहिती देऊन माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आणि चुकीचे आरोप करत आहेत”.

आणखी वाचा – दोन घटस्फोट, दोन मुलं अन्…; ४०शीनंतरही श्वेता तिवारी सहकलाकाराला करत आहे डेट, रोमँटिक फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Nitish Bharadwaj (@nitishbharadwaj.krishna)

पुढे त्या म्हणाल्या की, “खुद्द नितीश यांनी कौटुंबिक सत्रन्यायालयामध्ये सांगितले होते की, त्यांनी मुलींशी एकाच फोनवर बोलणे केले होते. त्यामुळे फोन नंबर चुकीचा असल्याचा त्यांचा दावा चुकीचा आहे”. तसेच स्मिता यांनी बरेच खुलासे केले. त्या म्हणाल्या, “जर नितीशला मुलींची इतकीच काळजी होती तर ते माझ्या वकीलांशी, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबरही बोलू शकत होते. पण त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला”.

आणखी वाचा – आमिर खानने ‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटला लेकीच्या लग्नाचं दिलं होतं निमंत्रण, सुहानीच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “आजाराबद्दल त्यांना…”

नितीश यांनी पत्नी स्मिताच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले की, “पत्नी स्मिता यांनी त्यांच्या मुली देवयानी व शिवरंजनी यांना भेटू देत नाही आणि बोलू देत नाही. वारंवार मुलींची शाळा बदलत असते. ज्यामुळे नितीश यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे”. नितीश यांची पत्नी आयएएस असून दोघांचे लग्न २००९मध्ये झाले होते. २०१९मध्ये स्मिता व नितीश यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

Tags: divorce caseIAS smitanitish bhardwajpolice casesmitastatementtwin daughters
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Next Post
Ravindra Mahajani was killing me for no reason Madhavi revealed that incident

"नणंदेसमोरच रवीने मला रस्त्यामध्ये मारायला सुरुवात केली अन्…", 'त्या' असह्य वेदनांबाबत गश्मीर महाजनीच्या आईचा खुलासा, म्हणाल्या, "मारहाण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.