बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेचे श्री कृष्ण म्हणजेच नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहेत. एकीकडे त्यांची पत्नी स्मिता यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्यांची कायदेशीर लढाई सुरु असतानाच दुसरीकडे त्यांच्या मुलींच्या बोलण्याने ते दुखावले गेले आहेत. नितीश भारद्वाज यांनी सांगितले की, त्यांना दोन्ही मुलींनी सांगितले की, मला पप्पा म्हणणे त्यांना आवडत नाही. नितीश भारद्वाज यांचा जीव त्यांच्या मुलींमध्ये अडकला आहे. ते कधी-कधी चित्रपटाच्या शूटिंगलाही त्यांना घेऊन जात असत. (Nitish Bhardwaj On Sushant Singh Rajput)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा नितीश भारद्वाज यांच्या मुलींच्याही खूप जवळचा होता. तो दोघींचेही खूप लाड करायचा. स्वतः नितीश भारद्वाज यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबद्दल सांगितले होते. सुशांत सिंग राजपूतच्या ‘केदारनाथ’ चित्रपटामध्ये नितीश भारद्वाज यांनी सारा अली खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जुळ्या मुली देवयानी व शिवरंजनी यांनाही सेटवर घेऊन जायचे. नितीशने सांगितले की, “सुशांतने त्यांच्या मुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे वचन दिले होते, परंतु दुर्दैवाने तो विसरला”.

नितीश भारद्वाज यांनी सांगितले की, “बरोबर एका महिन्यानंतर सुशांतने फोन करुन मुलींची माफी मागितली. त्या दोघीही पटकन तयार होत नसल्या तरी सुशांत त्यांना पटवण्यात यशस्वी ठरला”. सुशांत काही दिवसांतच नितीश भारद्वाज यांच्या मुलींचा जवळचा व चांगला मित्र बनला. सुशांतचा मृत्यू झाल्यावर नितीश भारद्वाज यांना मोठा धक्का बसला.
नितीश भारद्वाज यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी नुकतीच पत्नी स्मिता गाते यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. नितीश यांनी त्यांच्या माजी आयएएस पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता, ज्याचा परिणाम त्यांच्या मुलींवरही झाला होता. पत्नी आपला मानसिक छळ तर करत आहेच, पण मुलींनाही भेटू देत नाही, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले होते. नितीश भारद्वाज यांनी १४ मार्च २००९ रोजी स्मिताशी दुसरे लग्न केले. स्मिता मध्य प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.