बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याचया ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला. याआधी अभिनेत्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या यनिंमळ चित्रपटाची चांगललीच चर्चा रंगली. अशातच रणबीर त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यावर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच छोट्या पडद्यावर रामायण मालिकेद्वारे रामाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अरुण गोविल यांनीही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अरुण गोविल यांना रणबीर कपूर साकारत असलेल्या रामाच्या भूमिकेबद्दल त्यांचे मत विचारले गेले. यावेळी त्यांनी उत्तर देत असं म्हटलं की, “येणारा काळचं याबद्दल नेमके उत्तर देईल असं मला वाटतं. रणबीरबद्दल म्हणायचे झाले तर तो एक चांगला अभिनेता आहे. त्यामुळे तो साकारणार असलेल्या भूमिकेबद्दल मी आता काहीही बोलणे उचित होणार नाही”.
आणखी वाचा – लेकीच्या डेटच्या चर्चांना बोनी कपूर यांनी दिला पूर्णविराम?, शिखर पहाडियाबरोबर दिसले पण…; नेमकं काय घडलं?
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “रणबीर हा एक पुरस्कार विजेता अभिनेता आहे. त्याला मी जितकं ओळखतो त्याप्रमाणे त्याच्यात अनेक मूल्ये आणि संस्कृती आहेत. तो खूप संस्कारी मुलगा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, तो या भूमिकेसाठी त्याच्या पद्धतीने सर्वोत्तम देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे कोणाबद्दल आता काहीच सांगता येणार नाही. येणारा काळच यावर नेमके उत्तर देईल.”
दरम्यान, आत्तापर्यंत नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटासाठी अनेक सकलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या नावावर श्री राम व सीता यांच्या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तसेच सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, लारा दत्त कैकयी आणि अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.