नुकताच मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. तीन दिवस आयोजित केलेल्या सोहळ्यात बॉलिवूडसहित इतर अनेक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती आल्या होत्या. पण या सोहळ्यामध्ये अधिक चर्चा झाली ती अंबानी कुटुंबातील माहिलांच्या दागिन्यांची व कपड्यांची. नीता अंबानी,श्लोका मेहता,राधिका मर्चंट, ईशा अंबानी या सगळ्याजानी खूप सुंदर अशा पेहरावात पाहायला मिळाल्या. मिळालेल्या माहितीनुसार अंबानी कुटुंबाचे कपडे प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केले होते. (Ambani family ritual)
नीता अंबानी तसेच त्यांच्या घरातील इतर महिला या नेहमीच सुंदर कपड्यांमध्ये दिसत असतात. अनंत व राधिकाच्या सोहळ्यामध्ये जास्त चर्चेत आला तो ईशाचा रत्नांनी जडवलेला ब्लाऊज. या ब्लाऊजवर सोनं, हीरे, चांदीचे अनेक लहान लहान भाग लाऊन ब्लाऊज शिवला होता. पण कितीही महागडे कपडे आणि दागिने घालूनही सर्व महिलांच्या हातात नेहमी एक काळा दोरा बांधलेला दिसून येतो. हा काळा दोरा बांधण्याचे नेमके कारण काय हे जाणून घेऊया.
काळा दोरा हातात बांधल्याने यश मिळते. तसेच यामुळे वाईट नजरेपासूनही बचाव होतो आणि सर्व आजारही दूर राहतात. यामुळेच अंबानी कुटुंबाच्या सर्व माहिलांच्या हातात हा काळा दोरा पाहायला मिळाला आहे.
नीता अंबानी या स्वतः एक यशस्वी व्यावसायिका आहेत. त्या नेहमी आपल्या फिटनेस, डिझायनर कपडे तसेच महागड्या दागिन्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण तरीही त्यांच्या हातात नेहमी एक काळा दोरा असलेला पाहायला मिळतो. तसेच ईशादेखील नेहमी आपल्या आईप्रमाणे आपल्या हातात काळा दोरा बांधलेली दिसून येते.याबरोबरच अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोकादेखील हा रीतिरिवाज पाळताना दिसून येते. कोणताही कार्यक्रम असेल किंवा कुठेही बाहेर जायचे असेल तर तिच्या हातात नेहमी काळा दोरा बांधलेला असतो.या घराण्याची भावी सून राधिकानेदेखील ही पद्धत स्वीकारली असून प्री-वेडिंग फोटो शूटपासून ते लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तिच्या हातात काळा दोरा पाहायला मिळाला.