Nimrat Reaction On Aish-Abhishek : निम्रत कौर सध्या अभिषेक बच्चनबरोबरच्या अफेअरच्या अफवांमुळे चर्चेत आहे. निम्रत कौरमुळे अभिषेक व ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या सगळ्यामध्ये निम्रतचे लग्नाबाबतचे एक जुने विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘दासवी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने आपल्या लग्नाला नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले होते आणि हे सांगितल्यानंतर अभिषेकने ‘टचवुड’ असेही म्हटले होते. हे ऐकून निम्रत कौरने केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे.
अभिषेक बच्चनने १५ वर्ष लग्नाला झाली असल्याचं सांगताच निम्रत कौरने यावर केलेली कमेंट ऐकून अभिषेकही हैराण झाला. “लग्न फार काळ टिकत नाहीत”, असं निम्रत हसत म्हणाली. यावर ज्युनियर बच्चन तिला ‘धन्यवाद’ असे म्हणतो आणि दोघेही हसायला लागतात. त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने निम्रत कौरसमोर पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले होते. अभिषेक म्हणाला होता, “माझी पत्नी या बाबतीत कमालीची आहे. ती माझ्यासाठी नेहमीच एक अद्भुत भावनिक आधार आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर आहे. ऐश्वर्यासारखी जीवनसाथी मिळण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती व्यावसायिक पार्श्वभूमीतून आली आहे”.
आणखी वाचा – Tharal Tar Mag : मधुभाऊंच्या सुटकेसाठी अर्जुनचे प्रयत्न, सायली सोडून जाणार याचीही भीती, पुढे काय घडणार?
पुढे तो म्हणाला होता, “ती सर्व काही व्यवस्थित समजली आहे. ती माझ्यापेक्षा थोडे जास्त दिवस हे व्यवसायात असल्याने आता ती अचूक काम करत आहे. त्यामुळे तिला जग माहीत आहे. तिने हे सर्व सहन केले आहे”. यावेळी अभिषेकचे बोलणे ऐकून निम्रत हसताना दिसली. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. या जोडप्याने २००७ मध्ये लग्न केले आणि काही वर्षांनी त्यांनी त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केले.
आणखी वाचा – नातं जपलं! सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “लाडकी ताई…”
सध्या या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. अंबानी कुटुंबीयांच्या लग्नात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्याबरोबर एकटीच पोहोचली तेव्हापासून या चर्चांना अधिक उधाण आले. कारण अभिषेक त्याचे आई-वडील आणि बहिणीबरोबर पोहोचला होता. यानंतर अनेक वेळा ऐश्वर्या तिच्या मुलीबरोबर दिसली आणि अभिषेक गायब होता. आता अभिनेत्री निम्रत कौरबरोबर अभिषेकच्या अफेअरच्या अफवा पसरत आहेत. मात्र, या अफवांवर अद्याप अभिषेक व निम्रत कौरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.