बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचे नावे अलीकडे सर्वत्र चांगलेच चर्चेत आहे. एकीकडे नुकतंच अभिषेक बच्चनने वडील अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मुंबईत १० फ्लॅट्स खरेदी केले आहेत तर दुसरीकडे अभिषेक बच्चनचा नव्या चित्रपटातील लुक समोर आला आहे. अभिषेकने आगामी I Want To Talk (आय वॉन्ट टू टॉक) या चित्रपटातील त्याचा लूक जाहीर केला आहे. याआधी त्यांनी एक टीझर दाखवला होता आणि सर्वांना तो खूप आवडला होता. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्याची जबरदस्त भूमिका असणार आहे. (Abhishek Bachchan Movie Look)
अभिषेकने त्याच्या आगामी चित्रपटातील खास लूकचा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये अभिषेकचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. मोठे पोट, हाताला फॅक्चर, अंगावर मोठा झब्बा आणि त्याखाली हाफ पॅन्ट असा आगळावेगळा लूक असलेला असलेला अभिषेक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याच्या पोटावर काही निशाण आहेत, जणू काही त्याच्यावर एखादी शस्त्रक्रियाच झाली आहे. तसंच तो एके ठिकाणी टक लावून पाहत आहे. अभिषेककचा हा फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम सूरज चव्हाणची कामाला सुरुवात, शूटलाही गेला, फिल्मसिटीबाहेरील फोटो समोर
शूजित सरकारच्या चित्रपटातील आपला लूक शेअर करताना अभिषेक बच्चनने लिहिले की, ‘बोलण्यासाठी खूप काही आहे पण एक फोटो १०० शब्द बोलतो.’ हेअरस्टायलिस्ट आलिम खानने हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्याचबरोबर सोनाली बेंद्रे, झोया अख्तर, बहीण श्वेता बच्चन यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसेच अभिषेकच्या अनेक चाहत्यांनीही यावर आनंद व्यक्त करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
आणखी वाचा – काळवीट प्रकरणानंतर सलमान खानने बिश्नोई समाजाला दिली होती पैशांची ऑफर, लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा
दरम्यान, २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या I Want To Talk चित्रपटात अभिषेकची व्यक्तिरेखा आव्हाने आणि कठीण काळात चांगली बाजू पाहणाऱ्या व्यक्तीची असेल जो लोकांशी बोलण्यासाठी जिवंत आहे. याशिवाय अभिषेक बच्चन आणखी एका चित्रपटात दिसणार आहे, जो प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. तसंच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटासाठीही त्याचे नाव पुढे आले आहे.