Suraj Chavan and Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात अनेक स्पर्धक मंडळींनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या पर्वाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या ट्रॉफीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने नाव कोरलं. त्यानंतर सगळीकडून सूरजचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळालं. ‘बिग बॉस मराठी’ संपलं असलं तरी या पर्वातील स्पर्धकांची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सगळेच स्पर्धक ‘बिग बॉस’नंतरही चर्चेत आहेत.
‘बिग बॉस’नंतर आता या घरातील स्पर्धक मंडळी एकमेकांना भेटताना दिसत आहेत. सूरजची पॅडी कांबळे, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा या स्पर्धकांनी भेट घेतली. तर डीपी वैभव, इरिना हे देखील कोल्हापुरात भेटले. यानंतर आता सूरज व जान्हवी यांची भेट झाली असल्याचं समोर आलं आहे. सूरजला भेटायला जान्हवी बारामतीत पोहोचली आहे. सूरजच्या गावी जात जान्हवीने खूप मोठं सरप्राइज दिलं आहे. जान्हवीला पाहून सूरजचा आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम सूरज चव्हाणची कामाला सुरुवात, शूटलाही गेला, फिल्मसिटीबाहेरील फोटो समोर
‘चांगभलं न्यूज’ या युट्युब चॅनेलवर सूरज व जान्हवी यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यांमध्ये सूरज जान्हवीला पाहून गाडी बाहेर पडताच घट्ट अशी मिठी मारत आहे. सूरज जान्हवीला पाहून असं म्हणतो की, “मी तुला खूप मिस केलं”. तर यावर जान्हवी म्हणते, “मी पण तुला खूप मिस केलं. पण तू बिझी होता म्हणून मला भेटायला उशीर झाला’. सूरज पुढे पारंपरिक अंदाजात साडी नेसून आल्याने तिचं कौतुक करतो. त्यानंतर सूरज घरातल्या मंडळींशी जान्हवीची भेट करुन देतो.
‘बिग बॉस’च्या घरात सूरज जान्हवी यांच्यात सुरुवातीला वाद झाले असले तरी त्यानंतर त्यांचं चांगलं बॉण्डिंग पाहायला मिळालं. सूरज व जान्हवी यांचं बहीण भावाचं उत्तम असं नातं पाहायला मिळालं. आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर बहीण भेटायला येताच भाऊराया खूप खुश दिसला. ‘लाडकी माझी ताई’ असं कॅप्शन देत सूरजने जान्हवीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.