‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच मन जिंकलं. स्त्री प्रधान असलेल्या या मालिकेत अश्विनीची तारेवरची कसरत नेहमीच पाहायला मिळाली. या मालिकेतील अश्विनी हे पात्र अभिनेत्री दीपा परब साकारताना दिसतेय. मालिकेत अश्विनीची मिसेस इंडिया साठी सुरु असलेली तयारी पाहायला मिळाली. मात्र कुटुंबाची जबाबदारी आणि नवर्याच्या शब्दाखातर ती तिचा प्रवास थांबवते. (tu chal pudha)
दरम्यान तिची जिद्द पाहून कुटुंबीय आणि तिची जिवलग मंडळी तिला तिच्यातल्या कलेची जाणीव करून देतात आणि तिला बळ देतात. त्यावेळी आपला निर्णय बदलून अश्विनी पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मनाची तयारी करते. मात्र हा निर्णय काही श्रेयसला पटलेला नसतो. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अश्विनीची योग्य दिशेने होणारी वाटचाल पाहून श्रेयस तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो.
पहा अश्विनी समोर आलंय नवं संकट (tu chal pudha)
प्रोमोमध्ये श्रेयस सर्वांसमोर अश्विनीला बोलतो, तू हे सिद्ध केलंस, माझ्यापेक्षा जास्त ही स्पर्धा तुझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. तुला माझी गरजच नसेल तर हेच कारण योग्य आहे असे म्हणत तो हातातली कागद पुढे सरकावतो आणि म्हणतो डिवोर्स पेपर्स. यावर अश्विनी श्रेयसकडे पाहून म्हणते, एका कागदावर सही करून हे नातं नाही संपणार. कुटुंबाच्या भल्यासाठी बाहेर पडलेली स्त्री अशा गोष्टींना घाबरून मागे नाही फिरणार असे हसत म्हणते. (tu chal pudha)
एक स्त्री म्हणून वा एक गृहिणी म्हणून अश्विनीने पहिल्या दिवसापासून आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडल्या. तक्रार करण्यासाठी जागा न सोडणाऱ्या अश्विनीने नेहमीच कुटुंबियांसोबत आणि इतरही मित्र मंडळींसोबत आपलं नातं बनवलं. यात मात्र तिला तिच्या नवऱ्याची म्हणजेच श्रेयसची कधीच साथ मिळाली नाही.
=====
हे देखील वाचा – पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘अहो..’ म्हणत जेनेलियाच्या व्हायरल व्हिडिओचं होतंय कौतुक
====
आपल्या नवऱ्याने आपलं कौतुक करावं असं प्रत्येकालाच वाटत तास अश्विनीलाही वाटत, मात्र ते सुख अश्विनीच्या वाटेला आलंच नाही. अश्विनी ब्युटी पार्लर सुरु करून अश्विनीने स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक पायरी चढलीच. आता मिसेस इंडिया होण्यासच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या अश्विनीच्या वाटेत अनेक अडथळे आहेत त्या अडचणींवर मात करत अश्विनी ही लढाई कशी लढणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.