सोशल मीडियावर चाहते मंडळी आपल्या आवडत्या कलाकारांकडे अनेक मागण्या करत असतात. कलाकारही आपल्या चाहत्यांच्या या मागण्या पूर्ण करतात. मात्र कधी कधी या चाहत्यांकडून कलाकारांकडून काहीही मागण्या असतात. जसे की एखाद्या अभिनेत्रीला लग्नासाठी विचारणे. याआधी अनेक चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रींना लग्नासाठी विचारले असल्याचे पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियाद्वारे प्रेम व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरला एका चाहत्याने सोशल मीडियाद्वारे लग्नाची मागणी घातली असून अभिनेत्रीने या संवादाचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे आणि त्याला खास शैलीत उत्तरही दिलं आहे. (netizen proposed marriage to amruta khanvilkar)
अमृता खानविलकर मराठीसह हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरील आपल्या हटके फोटोंमुळे ती कायमच चर्चेत राहत असते. अशातच ती चाहत्याच्या सोशल मीडियावरील लग्नाच्या मागणीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अमृताला एका नेटकऱ्याने लग्नाची मागणी घातली. “अमृता खानविलकर मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मला तू खूप आवडते आणि मी तुझ्याशी लग्न करायला उत्सुक आहे. कृपया मला तुझा आजीवन पती बनव. मी भारतीय सुनील”. असं म्हणत त्याने अमृताला लग्न करण्याबद्दल विचारले आहे.

आणखी वाचा – Video : ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर पाणीपुरी पार्टी, लीलाचा चटपटीत पदार्थांवर ताव, व्हिडीओ समोर
नेटकऱ्याच्या या अजब मागणीला अमृता खानविलकरनेही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “नमस्कार, भारतीय सुनील. तुमच्या या ऑफरबद्दल धन्यवाद. पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, जरी तुम्हाला माझे आयुष्यभराचे पती व्हायचे असले तरी… खरंच मला माफ करा”. दरम्यान, अमृताने शेअर केलेला चाहत्याच्या अजब लग्नाच्या मागणीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच चाहत्याला नाराज न करता योग्य उत्तर देत नकार दिल्याने तिचं कौतुकही होत आहे.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, पार पडला साखरपुडा सोहळा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दरम्यान, अमृताच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच ‘संगीत मानापमान’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या ‘वंदन हो’ गाण्यातील नृत्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याआधी ती ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटात महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसली होती. तसंच ‘लाइक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातही ती एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.