‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत असलेली पाहायला मिळत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत राकेश बापट हा तगडा कलाकार मराठी मालिकेतून पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर त्याच्याबरोबर लीला हे पात्र अभिनेत्री वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेत काम करणारी ही कलाकार मंडळी कधीकधी शूटिंगशिवाय इतर मजामस्तीही करतात आणि याचे काही खास क्षण ते आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच लीला म्हणजेच वल्लरीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Navri Mile Hitlerla set panipuri party)
वल्लरीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सेटवरील पाणीपुरीच्या पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीलाची पहिली मकरसंक्रांत साजरी होत आहे. एजे लीलाच्या प्रेमात पडला आहे आणिस त्याला लीलासाठी असलेल्या प्रेमाची जाणीवही झाली आहे. आता मकरसंक्रांतीनिमित्त एजेने लीलासाठी खास हलव्याचे दागिने बनवले आहेत. याआधी एजेने, लीलासाठी खास पाणीपुरी तयार केली होती. याचे काही क्षण तिने शेअर केले आहेत.
आणखी वाचा – सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याला बक्षिस, मिळाली रोख रक्कम कारण…
या व्हिडीओमध्ये दुर्गा म्हणजेच शर्मिला शिंदे लीलाकडे पाणीपुरी मागते, मात्र यावेळी ती शर्मिलाला नाही म्हणत स्वत:च्या हाताने पाणीपुरी तयार करते आणि त्यावर ताव मारते. पाणीपुरी प्रेमी असं म्हणत वल्लरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. एकूणच मालिकेत होणाऱ्या शूटिंगमधून वेळ काढत कलाकार मंडळी आनंद लुटतात. हेच या व्हिडीओमधून दिसून येत आहे. मालिकेकया मुख्य कलाकारांबरोबरच इतर मंडळीही या पाणीपुरी पार्टीचा मनमुराद आनंद घेत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा
दरम्यान, दरम्यान, मालिकेत सध्या एकीकडे एजेला तो लीलाच्या प्रेमात पडला आहे, याची जाणीव झाली आहे. तर दुसरीकडे लीलाच्या आयुष्यात मन्या नावाची व्यक्ती आली आहे. खरं तर हा सरस्वतीचा भाऊ विक्रांत आहे, जो वेशभूषा बदलून आला आहे. पण त्याच्या येण्याने आता लीला-एजेच्या आयुष्यात काय नवं वळण येणार? या मित्रामुळे दोघांच्या नात्यात काय बदल होणार का? लवकरच पाहायला मिळेल.