Kartiki Gaikwad Brother Engagement : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकले. त्यानंतर नुकताच शिवानी सोनार व अंबर गणपुळे यांची हळद साजरी झाली. त्यानंतर आता ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडचा भाऊही विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकीने आपल्या भावाचा व होणाऱ्या वहिनीचा फोटो शेअर करत त्यांचे लग्न ठरल्याचे सांगितले होते. अशातच कार्तिकीच्या भावाचा साखरपुडा पार पडला आहे. (Kartiki Gaikwad Brother Engagement)
कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ गायकवाडचा साखरपुडा नुकताच पार पडला असून कार्तिकीने या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच भावाला शुभेच्छा देत तिने असं म्हटलं आहे की, “तुम्हाला साखरपुड्याच्या आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दोघंही असेच कायम आनंदी राहा, तुम्हा दोघांना खूप प्रेम”. कार्तिकीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कौस्तुभ आणि त्याच्या पत्नीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोत या जोडप्याने इंडो-वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर पाणीपुरी पार्टी, लीलाचा चटपटीत पदार्थांवर ताव, व्हिडीओ समोर
कौस्तुभने काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर “officially engaged! we’re engaged. yes to forever” असं म्हणत होणाऱ्या बायकोबरोबरचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून चाहते त्याच्या लग्नाची वाट बघत होते. अशातच आता त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. कार्तिकीला आपल्या घरातच गायनाचा वारसा लाभलेला आहे. तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाड सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.

आणखी वाचा – 21 January Horoscope : मेष, कर्क व तूळ राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात आणि कामात यश मिळेल, जाणून घ्या
कार्तिकी, तिचे वडील व भाऊ कौस्तुभ मिळून गाण्यांचे अनेक शोज देखील करतात. ‘बॉईज’ चित्रपटातलं ‘लग्नाळू’ हे गाणं कौस्तुभने गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं आणि आजही या गाण्याची चर्चा होताना दिसते. याशिवाय त्याने अनेक भक्तीगीत व अभंग गायली आहेत. अशातच आता हा गायक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.