Navri Mile Hitlerla : नोरंजनासाठी छोटा पडदा म्हणजेच टीव्ही हे प्रेक्षकांसाठी कायमच सोयीचे माध्यम ठरला आहे. त्यामुळे मालिका या अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतात. काही मालिका या प्रेक्षकांच्या अगदी आवडत्या असतात. कमी कालावधीत या मालिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतात. अशा काही मालिकांपैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आहे. या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे मालिकेची कथा व कलाकार हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla New Promo)
अशातच या मालिकेच्या आगामी कथानकाचा एक नवीन प्रॉमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्याचाच हा प्रोमो आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये लीला व एजे यांच्यासह संपूर्ण जाहागीरदार कुटुंब फिरायला गेले असून यावेळी लीला एजेंबद्दल आपलं प्रेम व्यक्त करणार आहे. यावेळी क्रूझवर लीला-एजे दोघे एकत्र खूप वेळ घालवणार असून लीला एजेंला तिच्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करणार आहे.
नुकत्याच झालेल्या भागात लीला एजेंच्या फोटोबरोबर बोलत आहे. तेव्हा ती म्हणते की, “एजे, खरंतर तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच कळत नाही.” तिचं हे बोलणं आजी ऐकतात आणि लीलाला म्हणतात, “प्रेमात पडली आहेस ना? मग अभिरामला कधी सांगणार आहेस हे सगळं?” त्यावर लीला म्हणते की, म्हणजे मला सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच कळत नाही.” यावर आजी तिला समजावत म्हणतात की, “अगं असं काय? तू आता जात आहेस ना फिरायला, तिथे वातावरणपण छान असेल.” लीला म्हणते, “आता काहीही झालं तरी मी त्यांना सगळं सांगेन”.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’चा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांनाही भलताच आवडला आहे, अनेकांनी या प्रोमोखाली ‘खूप छान’, ‘आतुरता’, ‘आता वाट बघणे अशक्य आहे’, ‘आणखी वाट पाहू शकत नाही’ अशा अनेक कमेंट्स करत या नवीन ट्विस्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. एजे व लीलामध्ये सुरुवातीला मोठे गैरसमज होते. मात्र आता लीला एजेच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लीला तिच्या भावना एजेला सांगू शकणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.