शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि ड्रामा… या वीकेण्डला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, नक्की काय पाहायचं? वाचा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 26, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Taaza Khabar 2, Love Sitara, Honeymoon Photographer series will be released on OTT from 27th September see the details

२७ तारखेपासून ताजा खबर २, लव्ह सितारा, हनिमून फोटोग्राफर या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सध्या टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळताना पाहायला मिळते. ओटीटीवर विविध विषय अतिशय सुंदररित्या हाताळतात आणि ही वेगळी धाटणी प्रेक्षकांनादेखील ओटीटीकडे आकर्षित करते. कौटुंबिक, रोमॅंटिक, हॉरर अशा धाटणीचे अनेक चित्रपट व वेबसीरिज ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच या आठवड्यातही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे? या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला कोणत्या सीरिज व चित्रपट येणार आहेत, जाणून घ्या… (OTT Series News)

ताजा खबर २ : ‘ताझा खबर’ वास्याच्या (भुवन बाम) कथेचे अनुसरण करते, जो एक स्वच्छता कर्मचारी आहे आणि त्याच्याकडे भविष्य पाहण्याची शक्ती आहे. या शक्तीमुळे त्याचे दिवस पालटतात. ‘ताजा खबर २’ सीरिजची कथा वसंत गावडे उर्फ ​​वास्याची आहे आणि भुवन बाम त्याच व्यक्तिरेखा साकारत आहे. वसंतला अचानक जादूची शक्ती प्राप्त होते. २७ सप्टेंबरपासून Hotstar या ओटीटी माध्यमावर ही सीरिज पाहता येणार आहे. यामध्ये भुवन बाम, श्रिया पिळगावकर, जावेद जाफेरी, महेश मांजरेकर, देवेन भोजानी, प्रथमेश परब, नित्या माथूर आदी कलाकार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

आणखी वाचा – “माझ्या आयुष्यातील…” कार्तिकी गायकवाडची नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट, फोटोने वेधलं लक्ष

लव्ह सितारा : नागार्जुनची भावी सून आणि नागा चैतन्यची होणारी पत्नी, अभिनेत्री शोभिता धुलिपालाचा ‘लव्ह सितारा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, बी जयश्री, संजय भुतियानी, तमारा डिसूझा, रिजुल रे आणि व्हर्जिनिया रॉड्रिग्ज यांच्या भूमिका आहेत. तुम्ही ते झी-५ वर २७ सप्टेंबर २०२४ रोजी पाहू शकाल.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

आणखी वाचा – “जमलेल्या माझ्या तमाम…”, तेजस्विनी पंडीतच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, राज ठाकरेंच्या डायलॉगने वेधलं लक्ष

हनिमून फोटोग्राफर : अर्जुन श्रीवास्तवच्या या सीरिजची कथा एका व्यावसायिक छायाचित्रकारावर केंद्रित आहे, जो एक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी मालदीवमध्ये जातो. पण कथेला ट्विस्ट येतो जेव्हा तिच्या क्लायंट वराचा मृत्यू होतो. या मालिकेत आशा नेगी, राजीव सिद्धार्थ, अपेक्षा पोरवाल आणि साहिल सलाथिया मुख्य भूमिकेत आहेत. ‘हनिमून फोटोग्राफर’मध्ये साहिल सलाथिया, अपेक्षा पोरवाल आणि संदेसा स्वल्का हे कलाकार आहेत. ही सीरिज २७ सप्टेंबर रोजी जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

द ग्रेट इंडिया कपिल शो : नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’चा दुसरा सीझन सुरू झाला आहे. या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. दुसरा एपिसोड २८ सप्टेंबरला येणार आहे. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. हे स्टार्स त्यांच्या देवरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत आहेत. देवरा: पार्ट १ २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: Honeymoon PhotographerLove SitaraTaaza Khabar 2
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
divya dutta viral post

फ्लाइट रद्द, कर्मचारीही नाहीत, प्रवाशांबरोबर गैरवर्तन अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला इंडिगो एअरवेजचा वाईट अनुभव, नेमंक काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.