झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे नाव घेतले जाते. कलाकारांचा अभिनय, मालिकेचा वेगळेपणा, तसंच हटके कथानक अशा अनेक कारणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. या मालिकेतील एजे व लीला ही पात्रे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसतात. त्यांच्यातील केमिस्ट्री लोकप्रिय ठरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एजे लीलाच्या प्रेमात कधी पडणार, तो तिच्या प्रेमात असल्याची जाणीव त्याला कधी होणार, याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. (navri mile hitlerla serial update)
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील शिस्तप्रिय एजे जितका प्रेक्षकांना आवडतो तितकीच वेंधळी लीलादेखील प्रेक्षकांना आवडते. अनेकदा वेंधळापणा करणारी लीला प्रसंसंगी लीला धाडसाने संकटांना सामोरी जाते. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत कायमच नवनवीन ट्विस्ट येत असतात. अशातच आता मालिकेत पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट येणार आहे.
आणखी वाचा – अक्षरा आई होणार असल्याचं सत्य भुवनेश्वरीला समजणार, अधिपतीशी बोलण्यासाठी धडपड, एकत्र कधी येणार?
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील जहागीरदारांच्या घरी होणार नव्या पाहुणीची एन्ट्री होणार आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टबद्दलची माहिती देण्यात आली आहे. झी मराठीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक बाई पाठमोरी उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये त्या बाईचा लूक हा अगदी गावरान व बिनधास्त असल्याचेही दिसून येत आहे. तसंच या बाईने केसात गजरा व लाल वेणी बांधल्याचेही पाहायला मिळत आहे. या बाईसह या पोस्टवर ‘जहागीरदारांच्या घरी नव्या पाहुणीची एन्ट्री’ असं लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, येत्या ७ जानेवारीला या नवीन पाहुणीच्या एन्ट्रीबद्दल प्रेक्षकांना माहिती होणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस प्रेक्षकांना ‘जहागीरदारांच्या घरी होणाऱ्या नव्या पाहुणीची एन्ट्रीसाठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आता ही नवीन पाहुणी नक्की कोण आहे? तिच्या येण्याने जहागीरदारांच्या घरी नक्की काय होणार? तसंच एजे-लीला यांच्या नात्यात नक्की काय घडणार? हेही लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.