Television Actress Pregnancy : अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली आहेत, परंतु अद्याप त्यांना आई होण्याचे सुख लाभलेले नाही. आणि यामुळे काही जोडप्यांचे नातेही बिघडत असल्याचे पाहायला मिळाले. असे अनेक कलाकार आहेत ज्या लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही आई होऊ शकल्या नाहीत. हिंदी टेलिव्हिजन विश्वात अशा अभिनेत्रींचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळालं आहे. पायल रोहतगी, अंकिता लोखंडे, चंद्रमुखी चौटाला, दिव्यांका त्रिपाठी या अभिनेत्रींचं यांत नाव घेतलं जातं. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही या अभिनेत्री आई होण्यापासून लांब राहिल्या आहेत. यामागे प्रत्येकीचं वेगवेगळं कारण असल्याचं समोर आलं आहे.
आई न होण्याच्या कारणामुळे अभिनेत्री पायल रोहतगी व संग्राममध्ये सध्या जोरदार भांडण सुरु आहे. अलीकडेच या दोघांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पायल संग्रामकडून दत्तक घेण्यासाठी कागदपत्रे मागताना दिसत आहे. पायलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन ती आई होऊ शकत नाही, त्यामुळे तिला मूल दत्तक घ्यायचे आहे, पण संग्रामला मूल दत्तक घ्यायचे नसल्याचे तिने या व्हिडीओद्वारे सांगितले.
आणखी वाचा – अक्षरा आई होणार असल्याचं सत्य भुवनेश्वरीला समजणार, अधिपतीशी बोलण्यासाठी धडपड, एकत्र कधी येणार?
टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहता सर्वत्र चर्चेत आहे. तिचे आणि रवी दुबेचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. हे जोडपे अद्याप पालक बनलेले नाही. तर अभिनेत्री भावना सेठ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ती व्लॉग बनवत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. संभावना अजून आई झाली नाही. तिने अनेकवेळा आयव्हीएफ केले आहे, परंतु तेदेखील यशस्वी झाले नाही. संभावनाने बरेचदा आई होण्याची तळमळही व्यक्त केली आहे.
अंकिता लोखंडे ही टीव्हीवरील आवडत्या सूनांपैकी एक आहे. अंकिता व विकी जैन त्यांच्या कुटुंब नियोजनाचा विचार करत आहेत. परंतु ते अद्याप पालक झाले नाहीत. तर इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला या टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर गेल्या आहेत. आता अभिनेत्री कविता ४३ वर्षांची असून सध्या गरोदर राहण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. चाहते या कपलकडून चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत. मात्र दिव्यांका अजून आई होऊ शकलेली नाही.