Navri Mile Hitlerla serial update : झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळच वळण आलं आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत मालिकेत आपर्णाचा मोठा अपघात होतो. तेव्हापासून अपर्णा या जगातून निघून गेल्याच्या दुःखात अर्जुन आपलं देहभान विसरून जातो. पण, अपर्णाचा मृतदेह मात्र गाडीत सापडत नाही, त्यामुळे अर्जुनला विश्वास आहे की, अपर्णा अजूनही जिवंत आहे. तो दररोज तिचा शोध घेतो. अमोललाही माझी मां परत घरी येणार, असा विश्वास आहे आणि अशातच अप्पी पुन्हा परतली आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्यातून अप्पीची झलक पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla serial update)
अमोलच्या निर्धारानं प्रभावित होऊन, अर्जुन नरसोबाची वाडीला जातो. तो आदल्यादिवशी पाहिलेल्या मुलीबद्दल अधिक जाणून घ्यायला उत्सुक आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर त्याने दीपाला पाहिलं. यावेळी, दीपाचा रांगडा स्वभाव त्याला दिसतो. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लकशब वेधून घेत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला तो असं म्हणतो की, “अप्पे तू या जगात नाही हे मान्य कर असं लोक म्हणतात. पण नक्की कशाकशाटुन्न काढू तुला? माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फक्त तू आहेस, या वस्तू आणि गोष्टी मला ओरडून सांगत आहेत की, अर्जुन जा आणि अप्पीला घेऊन ये”.
आणखी वाचा – Video : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ, चाहती फोटो काढायला येताच केलं लिप किस, नेटकऱ्यांचा संताप
यानंतर एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर तो अप्पीला बघतो, तेव्हा त्याला अप्पी सारखीच एक मुलगी दिसते. मात्र, तिच्या वागणुकीतून आणि बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला जाणवतं की ही अप्पी नसावी. मालिकेचा हा प्रोमो बघून प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसल्याचे मत त्यांनी कमेंट्समधून व्यक्त केलं आहे. “केले चालू डबल रोल आता”, “एका ऑफिसरला वडे तळताना बघायचेच बाकी होते आता?”, “आर किती वेळा तुम्ही दोघे हरवणार आहात?”, “बंद करा ही मालिका” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी या नवीन ट्विस्टवर नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “तरीही लोक टीव्ही अॅक्टरच समजतात”, शशांक केतकरची खंत, म्हणाला, “इतकं काम करुनही…”
दरम्यान, अर्जुन आता दीपाला भेटून तिने काही दिवस अमोलसाठी अप्पी व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच अप्पीच्या रुपात आलेली दीपा कशाप्रकारे घरातल्यांच्या प्रश्नांचा सामना करणार या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.