आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण. आपल्या आवाजाने चर्चेत राहणारे हे गायक गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांनी लाईव्ह शो दरम्यान महिला चाहतीला केलेला किस. गायक उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका महिला चाहत्याला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि यामुळे सध्या ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झाले आहेत. उदित नारायण ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजजवळ आली होती. तेव्हा फोटो काढून होताच गायक तिच्या ओठांवर किस करतात. (Udit Narayan kissing Another video)
अशातच आता त्यांचा आणखी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये ते सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिला चाहत्याला किस करत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी महिला चाहत्याच्या ओठांवर किसही केल्याचे दिसत आहे. ‘उदित नारायणचा आणखी एक व्हिडिओ’ असं कॅप्शन देत एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून आता उदित नारायण पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. या व्हिडिओवर लोक मोठ्या संख्येने आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, ‘वाह हा तर एक विकृत माणूसच आहे.’ तर दुसऱ्याने “हे खूप मूर्खपणाचे लक्षण आहे” असं म्हटलं आहे.
Another video of Udit Narayan pic.twitter.com/dYGWgPfUHl
— Savage SiyaRam (@SavageSiyaram) February 5, 2025
आणखी वाचा – “देशात मांसाहारावरच बंदी आणा”, शत्रुघ्न सिन्हांचं मोठं विधान, म्हणाले, “फक्त गोमांसच नाही तर…”
आणखी एका नेटकऱ्याने इमरान हाश्मी आणि उदित नारायण यांचे मीम शेअर करत ‘इमरान हाश्मीचा गॉडफादर’ अशी कमेंट केली आहे. लिप किसनंतर झालेल्या गदारोळावर उदित नारायण यांनी एका मुलाखतीत याबद्दल म्हटलं होतं की, “मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या देशाला लाज वाटेल असे काही केले आहे का? आयुष्याच्या या टप्प्यावर मी सर्व काही मिळवले असताना आता मी काहीही का करु? व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहिले आहे त्यावरुन माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील प्रेम दिसून येते. ते माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांच्यावर अधिक प्रेम करतो”.
यापुढे उदित नारायण म्हणालेले की, “याबद्दल मला कोणतीही लाज किंवा खेद वाटत नाही. आता बोलताना माझ्या आवाजातून तुम्हाला काही खंत किंवा दुःख ऐकू येते का? खरं तर, मी बोलत असताना हसतो. माझे हृदय स्वच्छ आहे. जर काही लोकांना माझ्या या प्रेमात काही घाणेरडेपणा पहायचा असेल तर मी त्यांच्यासाठी दिलगीर आहे. मला त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण आता त्यांनी मला पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्ध केले आहे”.