‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्री म्हणून सर्वांच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शशांकने मालिकाविश्वातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठी सिनेसृष्टीसह शशांकने हिंदी सिनेविश्वातही छाप पाडली. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो त्याचबरोबर तो अनेकदा राजकीय व सामाजिक विषयांवरही भाष्य करताना दिसतो. (Shashank Ketkar News)
अभिनेत्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून अनेक फॅन पेजेसदेखील आहेत, जे शशांकच्या कामाबद्दलची माहिती व कौतुकास्पद पोस्ट शेअर करत असतात. अशातच “prishank is my world”नावाच्या एका फॅन पेजने शशांकचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून शशांकने आजवर केलेल्या कामाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. शशांकने आजवर अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. पण त्याने त्याच्या करिअरमधील बराचसा काळ हा टीव्हीवरील मालिकांमध्ये विविध भूमिका करत गाजवला आहे.

आणखी वाचा – Video : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ, चाहती फोटो काढायला येताच केलं लिप किस, नेटकऱ्यांचा संताप
मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या शशांकने याचबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ‘prishank is my world’ या फॅन पेजने अभिनेत्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हाच व्हिडीओ शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “मागच्या १४ वर्षात तसं बरं आणि बरंच काम झालं आहे माझ्याकडून! इतकं करुनही शेवटी तू TV चा actor असं सहज म्हणतात लोक” अशी पोस्ट शेअर केली आहे. त्याने केलेल्या या पोस्टमधून लोकांच्या ‘TV चा actor’ असं म्हणण्यामागे अभिनेत्याला खंत वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शशांकने ‘सुवासिनी’, ‘रंग माझा वेगळा’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘स्वप्नांच्य पलिकडले’, ‘होणार सून मी या घरची’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पाहीले ना मी तुला’ अशा मालिकांमध्ये, ‘स्कॅम’, ‘गुनाह’, ‘शो टाइम’सारख्या सीरिज आणि ‘वनवे तिकीट’, ’३१ दिवस’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे