झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. अशातच लीलाची आई कालिंदी या लग्नात येऊन एजे व श्वेता ऐवजी एजे व लीला यांचे लग्न लावणार आहे. या कथानकाबद्दलचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
केवळ कालिंदीच नाही, तर विक्रांत, किशोर आणि साळुंके हे तिघेदेखील एजे व लीलाचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विक्रांतने प्लॅन बनवला असून, त्या प्लॅननुसार आता कालिंदीला पुढे जायचं आहे आणि विक्रांतच्या प्लॅननुसारच लीला व एजे यांचं लग्न होऊ शकतं, असं कालिंदीला वाटत आहे. एकीकडे विक्रांतच्या प्लॅननुसारच लीला-एजे यांचं लग्न होऊ शकतं, असं कालिंदीला वाटतं आहे. तर दुसरीकडे, विक्रांत या लग्नात शिरला असून एजेला याबद्दल कळलं आहे.
आणखी वाचा – नेत्राआधीच पाचवी पेटी शोधण्यासाठी रुपाली घराबाहेर, विरोचकामुळे गावकऱ्यांना धोका, कोणाला यश मिळणार?
लीलाच अभिरामची बायको कशी होईल, याची किशोर पुरेपूर काळजी घेणार आहे. तर लक्ष्मी, दुर्गा व सरस्वती लीला आणि तिच्या कुटुंबाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच कालिंदीचा लीला व एजे यांचं लग्न व्हावं या प्लॅनबद्दल समजलं आहे. त्यामुळे त्या तिघी लीलाला एजे व श्वेता यांच्या लग्नापासून लांब ठेवत आहेत. यासाठी त्या एक प्लॅन करतात आणि लीला एजेच्या लग्नातून लांब ठेवतात.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भावाची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या पारंपरिक विधींने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
त्यामुळे एजे व श्वेता यांच्या लग्नापासून लीलाला लांब ठेवण्यासाठी त्या एक प्लॅन करतात आणि एका माणसाला सांगतात. यावरून एक माणूस लीलाला एक सीनचे शूटिंग राहिले असल्याने लवकरच यावे असं सांगताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. त्यामुळे आता त्या माणसाच्या बोलण्यानुसार लीला एजेच्या लग्नातून जाणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.