रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“थोडंसं शेण लावा ना…”, मेकअप व्हिडीओवरुन सुनावणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाल्या, “तुम्ही रोज…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2024 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar On Trolling

"थोडंसं शेण लावा ना...", मेकअप व्हिडीओवरुन सुनावणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाल्या, "तुम्ही रोज..."

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. या रहस्यमय मालिकेतील गूढ उलगडताना पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. मालिकेत तितीक्षा तावडे व अजिंक्य ननावरे ही कलाकार मंडळी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या कथानकामुळे आणि मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका अधिक लोकप्रिय झाली आहे. (Aishwarya Narkar On Trolling)

ऐश्वर्या नारकर या मालिकेशिवाय सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ट्रेंडिंग रील व्हिडीओ त्या नेहमीच चाहत्यांसह सोशल मीडियावरुन शेअर देखील करतात. या ट्रेंडिंग रीलवरून बरेचदा ऐश्वर्या नारकर यांना ट्रोलही केलं गेलं आहे. दरम्यान त्यांनी या ट्रोलिंगवर वेळोवेळी उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. ऐश्वर्या ट्रोलर्सला न जुमानता नेहमीच त्यांना उत्तर देताना दिसतात.

आणखी वाचा – एजेंच्या लग्नापासून लीलाला दूर ठेवण्यास सूनांनी रचलं कटकारस्थान; यशस्वी होणार का?, श्वेताबरोबर विवाहबंधनात अडकणार

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

अशातच ऐश्वर्या व तितीक्षा यांचा एक रील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमद्ये दोघीही तयार होताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही मेकअप करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांचा पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने व्हिडीओवर केलेल्या खोचक कमेंटला ऐश्वर्या नारकरांनी सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : ‘ठरलं तर मग’मधील साक्षी-चैतन्यचा सेटवर धिंगाणा, माधुरी दीक्षितच्या गाण्यावर भन्नाट डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या व तितीक्षा यांच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने, “थोडंसं शेण लावा ना. छान दिसेल”, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत ऐश्वर्या यांनी त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. ऐश्वर्या यांनी या नेटकऱ्यांची कमेंट स्टोरीमध्ये पोस्ट करत, “तुम्ही रोज लावता का?”, असा प्रश्न विचारला आहे. ऐश्वर्या यांना त्यांच्या चाहत्यांनी सपोर्ट करत त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे.

Tags: aishwarya narkaraishwarya narkar and titeeksha tawde trollAishwarya Narkar On Trollingmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
shahid kapoor and mira rajput new home

शाहिद कपूर व मीरा राजपूत यांनी वरळीमध्ये खरेदी केलं अलिशान घर, किंमत तब्बल...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.