‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार लीलाच्या प्रेमाच पडल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सध्या मालिकेत लीला आणि एजेचं नातं एका वेगळ्या वळणावर आहे. आता हळुहळू एजेच्या मनात लीलाविषयी प्रेम निर्माण होतं. आपण लीलाशिवाय जगू शकणार नाही याची जाणीव एजेला झालेली असते. पण, आता एजे ही सर्वांसमोर केव्हा मान्य करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मन आणि बुद्धीच्या खेळात, एजे कुठल्या निष्कर्षावर पोहोचणार? हे लवकरच स्पष्ट होईल. अशातच मालिकेत लीलाच्या मित्राची एन्ट्री झाली आहे. एकीकडे एजे लीलावरचे प्रेम जाहीर करणार आहे, मात्र दुसरीकडे तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती आली आहे. (navri mile hitlerla serial update)
मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एजेची आई त्याला असं म्हणते की, “तू लीलाच्या प्रेमात पडला आहेस आणि तिच्यासाठीच हे सगळं करत आहेस? बरोबर आहे ना?”. त्यावर एजेही आईला असं म्हणतो की, “माझं प्रेम व्यक्त करण्याची हीच पद्धत आहे. मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. हीच माझी स्टाइल आहे”. त्यानंतर पुढे लीला एजेला असं म्हणते की, “मी माझ्या शाळेतल्या एका जुन्या मित्राला भेटणार आहे. ज्याचं नाव मन्या आहे”.
त्यानंतर आता आणखी एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये एजे आईला फोन करुन लीलाबद्दल विचारतात. तो आईला लीला कुठे आहे असं विचारतो. त्यावर आई म्हणतात की ती (लीला) अजून घरी आलेली नाही. यावर एजे असं म्हणतो की, अजून आलेली नाही”. त्यानंतर आई एजेला असं म्हणतात की, “तू एक काम कर तू तिथे जा आणि तिला घेऊन ये”. आजींचं हे बोलणं ऐकून लीलाची दमछाक होते. त्यानंतर ती धावत पळत रेस्टॉरंटमध्ये जाते. तेव्हा ती त्यांच्यापासून लपण्याचा प्रयत्न करते.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर लीला त्यांच्यापासून लपून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच एजे लीलाच्या मोबाइलवर फोन करतात आणि तिचा मोबाइल वाजतो. यामुळे ती त्यांच्या समोर येते. त्यानंतर ते लीला “तुमची भेट कशी झाली?” असं विचारतात. यावर लीला “आमचा वेळ खूप चांगला गेला. मला खूप उशीर झाला का?” असं म्हणते. पुढे लीला बोलत असतानाच एजे तिला रोखतात आणि निघून जातात. त्यामुळे आता एजेंना लीलाच्या या नवीन मित्राविषयी असुरक्षितता वाटत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, लीलाच्या आयुष्यातील हा नवीन मित्र मन्या नेमका कोण आहे? त्याच्या येण्याने आता लीला-एजेच्या आयुष्यात काय नवं वळण येणार? या मित्रामुळे दोघांच्या नात्यात काय बदल होणार का? आणि एजेना वाटत असलेले लीलाविषयीचे प्रेम ते व्यक्त करु शकणार का? हे लवकरच पाहायला मिळेल.