K Rajan Passes Away : तामिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते के राजन यांचे निधन झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीतून राजकारणी बनलेल्या खुशबू सुंदरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.के राजन यांच्याबाबत सांगितले जात आहे की, ते ८५ वर्षांचे होते आणि त्यांनी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला. तसेच त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्तात म्हटले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तमिळ वन इंडियाच्या वृत्तानुसार, राजनच्या मृत्यूबाबतअसे म्हटले जात आहे की, त्याने चेन्नईतील अड्यार पुलावरून नदीत उडी मारली होती. त्यानंतर अग्निशमन आणि बचाव पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
त्याचवेळी अभिनेत्री आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनीही के. राजन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती मिळताच तिने तिच्या एक्स हँडलवर त्याचा फोटो शेअर करून शोक व्यक्त केला. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले, “खूप वाईट बातमी. चित्रपटसृष्टीतील आमचे लाडके सदस्य, निर्माते के राजन सर यांच्या निधनाच्या वाईट बातमीने खूप धक्का बसला आहे. त्याने आत्महत्या केली हे अतिशय दुःखद आहे. ते एक अतिशय आदरणीय व्यक्ती होते आणि सत्य बोलण्यास कधीही मागेपुढे पाहत नव्हते. खूप वाईट वाटलं”.
आणखी वाचा – ४ वर्षांतच संसार मोडला! बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीने फसवणूक केली आणि…

यासोबतच अभिनेता आर सरथ कुमारने के राजन यांच्या निधनावर शोक व्यक्त करत इंस्टाग्रामवर लिहिले की, “तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे फिल्ममेकर श्री के. राजन यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने खूप दुःखी झाले आहेत. हा एक खोल धक्का आहे. १९८० च्या दशकात तमिळ चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारे अभिनेते आणि निर्माता के राजन यांचे आकस्मिक निधन हे तमिळ जगताचे मोठे नुकसान आहे. त्यांचे कुटुंबीय, सदस्य आणि मित्रांप्रती माझ्या मनापासून संवेदना”.
आणखी वाचा – काळ्या जादूने शेफाली जरीवालाचा मृत्यू?, पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, ” खूप विचित्र आणि…”
मात्र, चित्रपटांसोबतच राजन हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध होते. जर आपण त्याच्या कारकिर्दीबद्दल बोललो तर ते १९८० च्या दशकात तमिळ सिनेमाशी जोडले गेले होते. १९८३ मध्ये सुरेश अभिनीत ‘ब्रह्मचारिगल’ या चित्रपटातून त्यांनी निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली. एवढेच नाही तर के राजन यांनी त्यांच्या ‘गणेश सिने आर्ट्स’ बॅनरखाली अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी ‘उनाचिगल’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. यात अब्बा आणि कुमल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. इतकंच नाही तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. यात ‘डबल्स’, ‘अवल पावम’ आणि ‘निनाईकोठा नलिया’ या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.




