बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या खूप चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. अर्जुन व मलायका अरोरा यांची जोडी अधिक चर्चेत राहिली. मात्र रिलेशनशिपनंतर काही वर्षांतच त्यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली होती. ब्रेकअपनंतरही ते एकत्रित दिसून आले होते. मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अर्जुन सुरुवातीपासून तिच्या बरोबर असलेला दिसून आला. त्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुकदेखील केले. सोशल मीडियावरदेखील याबद्दलच्या अनेक चर्चा रंगलेल्या दिसून आल्या. अशातच आता अर्जुनने याबद्दल भाष्य केले आहे. (arjun kapoor on malaika arora)
अर्जुनने राज शमानीच्या मुलाखतीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने मलायकाबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “जेव्हा वडील व खुशी जन्हवीबरोबर श्रीदेवी यांच्याबद्दल घडले तो एक आवेग होता. यावेळीही तसंच काहीसं घडलं. जर मी एखाद्या व्यक्तीबरोबर भावनात्मरित्या जोडला गेला असेन तर मी त्या व्यक्तीच्या वाईट काळामध्ये त्याच्याबरोबर नेहमी उभं असेन. माझे खूप मित्र नाहीत. तसेच हे सगळं मी सगळ्यांसाठी नाही करत. जर एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी नको असेन तर मी लांब राहीन. जसं मी याआधीदेखील केलं आहे”.
पुढे अर्जुन म्हणाला की, “मला नाती गमावण्याची भीती नेहमी वाटते. माझी आई, माझे पाळीव प्राणी तसेच आजूबाजूच्या इतर अनेकांना गमावण्याची भीती वाटते. पण मी माझ्या मनातील ही भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्याचा परिणाम माझ्या नात्यांवर पडला आहे”.
दरम्यान ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी मलायकाबरोबरच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केले होते. त्याने सिंगल असल्याचे जाहीर केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अनेक जण मलायकाच्या नावाने चिडवण्यात आले होते. त्यानंतर अर्जुन म्हणाला की, “नाही, मी सिंगल आहे”. २०१८ पासून मलायका व अर्जुन यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरवातीला त्यांनी नात्यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांनी सगळ्यांसमोर नातं स्वीकारलं. दोघंही अनेक ठिकाणी एकत्रितपणे असलेले दिसून यायचे. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळायचे.