शनिवार, ऑगस्ट 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याची नाहीतर सासूची पत्रिका जुळली पाहिजे; सूनेची अट पडणार का भारी?, ‘कपबशी’ चित्रपटाच्या टिझरने वाढवली उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2026 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Cup Bashi Movie Teaser

नवऱ्याची नाहीतर सासूची पत्रिका जुळली पाहिजे; सूनेची अट पडणार का भारी?, 'कपबशी' चित्रपटाच्या टिझरने वाढवली उत्सुकता

Cup Bashi Movie Teaser : पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका ‘कपबशी’ या चित्रपटातून देण्यात आला आहे. अनोख्या कथेवर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने ‘कप बशी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’च्या निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे. ‘कप बशी’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आणखी वाचा – …म्हणून नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट करत नाही, नेटकऱ्याच्या प्रश्नाला जान्हवी किल्लेकरचं उत्तर, म्हणाली…

पारंपरिक पद्धतीने लग्न जमवताना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या पत्रिका जुळतात का हे पाहण्याची प्रथा आहे. मात्र, आजच्या काळात उच्च शिक्षित असलेली नवरी मुलगी होणाऱ्या सासूसमोर अत्यंत चमत्कारिक अट ठेवते. ती अट म्हणजे सासू-सूनेची पत्रिका जुळली पाहिजे. या अटीनंतर काय धमाल होते याची मनोरंजक गोष्ट ‘कप-बशी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीजरही कथानकाची उत्सुकता वाढवणारा आहे. अनोख्या कल्पनेला उत्तम अभिनय, खुसखुशीत संवादांची जोड असल्याचं टीजरमधून दिसत आहे. ऋषी मनोहर, पूजा सावंत ही नवी जोडी हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

आणखी वाचा – काळ्या जादूने शेफाली जरीवालाचा मृत्यू?, पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, ” खूप विचित्र आणि…”

आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक गोष्ट मांडण्यात आली असल्याने या दमदार टीजरने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 31, 2026 | 11:21 am
dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
Next Post
Dipika Kakar news

कॅन्सरशी लढताना सुप्रसिद्ध अभिनेत्री काय खाते?, आहारा'बद्दल सांगत म्हणाली, "हेल्दी फूड…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.