सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कलाकार मंडळी… सगळ्यांनाच हल्ली सोशल मीडियावर सरसकट ट्रोल केलं जातं. सोशल मीडिया हा एकमेकांबरोबर जोडलं जाण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. मात्र काही मंडळी इतरांना ट्रोल करत एकमेकांपासून तोडण्याचे काम करतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडला जातो. मात्र त्यानंतर आपण सोशल मीडियावर त्यांना काहीही बोलू शकतो असा एक समज काही नेटकऱ्यांमध्ये निर्माण होतो. ज्यांना चेहरा नाही, नाव नाही असे अनेक लोक कलाकारांना ट्रोल करतात. सोशल मीडियावर कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी व्यक्त होत असतात. (Sharmila Shinde Netizen Comment)
या सोशल मीडियामुळे कलाकारांना बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर सेलिब्रेटी अनेकदा व्यक्तही होतात. नुकतंच एका अभिनेत्रीला या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम शर्मिला शिंदे . मालिकेत शर्मिला दुर्गा ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाबवर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली अभिनेत्रीला एका नेटकऱ्याने कमेंट केली असून या नेटकऱ्याला अभिनेत्रीने सणसणीत उत्तरही दिलं आहे.
आणखी वाचा – Video : नवऱ्यासह अंकिता वालावलकरने गाठलं कोल्हापूर, डीपीबरोबर कुटुंबाचीही घेतली भेट, व्हिडीओ व्हायरल
झी मराठीची अकाऊंटद्वारे शर्मिला शिंदेच्या लहानपणीचा फटाका फोडतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली एका महिलेने अभिनेत्रीला “तू मला अजिबात आवडत नाही” अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री शर्मिलानेदेखील या महिलेला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “मला पण तुम्ही आवडत नाही” असं म्हटलं आहे. अभिनेत्रींना ट्रॉलर्सच्या ट्रोलिंगला सामारे जावे लागते. अनेकदा कलाकारांकडून या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं जातं. पण अभिनेत्रीने या टट्रोल करणाऱ्या महिलेला चांगलेच उत्तर दिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. जहागीरदार घरातील मोठी सून म्हणून ती तिची सर्व कर्तव्ये पार पाडताना दिसते. त्यामुळे लीला वेंधळी असल्याने त्या घरासाठी योग्य नाही, असे मानून ती तिला घराबाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसते. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मदतीने ती लीलाला त्रास देताना दिसते.