Ankita Walavalkar And Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वातील सगळ्या स्पर्धकांनी तुफान धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या शोमधील सर्व स्पर्धक घराघरातही विशेष चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. ‘बिग बॉस मराठी’ संपलं असलं तरीही स्पर्धक मंडळी एकत्र येत एकमेकांना भेट देत असताना दिसत आहेत. शो संपला असला तरी स्पर्धकांमधील मैत्री त्यांच्यातील भावा-बहिणीचं नातं हे अद्याप अजूनही आहे तसेच आहे. बऱ्याच स्पर्धकांची घराबाहेर पडल्यानंतर भेट झालेली पाहायला मिळाली. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ चा विजेता सूरज चव्हाणची वैभव व इरिना, जान्हवी यांनी त्याच्या घरी जाऊन भेट घेतलेली पाहायला मिळाली. तर वैभव-इरिना यांनी कोल्हापूर गाठत डीपीच्याही घरी भेट दिली.
इतकंच नव्हे तर आता डीपीची ‘बिग बॉस’ मधील बहीण अंकिता वालावलकर म्हणजेच सर्वांची लाडकी कोकणहार्टेडगर्ल हिनेदेखील तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह कोल्हापूर गाठत डीपीसह त्याच्या कुटुंबाला भेट दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून अंकिताला डीपीला भेटायचं होतं मात्र ती तिच्या घरी कोकणात राहत होती त्यामुळे ती धनंजयला काही भेटू शकली नाही. अखेर वेळात वेळ काढून अंकिताने कोल्हापूर गाठलं आणि धनंजयची भेट घेतली असल्याचे समोर आलं. अंकिता व धनंजय यांची मैत्री ही ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी पासूनची आहे कारण दोघंही पेशाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. एका क्षेत्रात काम करत असल्याने डीपी व अंकिता यांची बऱ्यापैकी एकमेकांशी ओळख होती. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर या दोघांचं भावा बहिणीचं नातं अजूनच घट्ट झालेलं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – भर दिवाळीमध्ये माधुरी दीक्षितसह घडला होता ‘हा’ प्रसंग, केसही जळले होते अन्…; अभिनेत्रीनेच केला खुलासा
‘बिग बॉस’च्या घरात एखाद्या टास्कदरम्यान व घरात वावरताना डीपी अंकिताच्या पाठीशी खंबीरपणे एखादा मोठ्या भावासारखा उभा राहिला. अगदी शेवटपर्यंत दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिलेली पाहायला मिळाली. बरेचदा त्यांच्यात भांडण देखील झाली मात्र त्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलून प्रश्न सोडवले आणि याचा त्यांच्या वैयक्तिक नात्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. अखेर आता अंकिताने कोल्हापूर गाठत धनंजयसह त्याच्या कुटुंबाला भेट दिलेली पाहायला मिळतेय. यावेळी अंकिताने थेट सोसायटी फर्निचर या डीपीच्या फर्निचरच्या दुकानाला भेट देत धनंजयची भेट घेतली. यावेळी तिथं धनंजयचे वडीलही होते. त्यांच्या पाया पडून तिने आशीर्वाद घेतले. त्यानंतर धनंजयची गळाभेट घेतल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी फोटोसेशन केलं.
आणखी वाचा – Video : नवऱ्यासह अंकिता वालावलकरने गाठलं कोल्हापूर, डीपीबरोबर कुटुंबाचीही घेतली भेट, व्हिडीओ व्हायरल
घरी आल्यानंतर धनंजयच्या पत्नीने अंकिता व कुणालसाठी खास नॉनव्हेजचा बेत केला होता. जेवण झाल्यानंतर अंकिताने ती ज्या कामासाठी कोल्हापुरात आली होती त्याची एक पोस्ट धनंजयने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. अंकिताने भाऊबीजच्या आधीच डीपी दादाबरोबर भाऊबीज साजरी करण्यासाठी कोल्हापूर गाठलं असल्याच समोर आलं. धनंजयने हे फोटो शेअर करत ‘भाऊबीज प्रक्रिया संपन्न’ असे कॅप्शन दिलं आहे. धनंजयची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय.