मालिका म्हटलं की त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग हा आलाच. कलाकारांचं मालिकेतील ऑनस्क्रीन बॉंडिंगप्रमाणे त्यांची पडद्यामागचे धमाल मस्ती पाहणं ही चाहत्यांना विशेष भावतं. पडद्यामागे कलाकार मंडळींची मजामस्तीम धमाल पाहणे प्रेक्षकांना कायमच आवडत असतं आणि ही कलाकार मंडळीदेखील त्यांची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. अशातच झी मराठीवरील लीलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील एजे (अभिराम जहागीरदार) व लीलाच्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. (Vallari Viraj Video)
या मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिचा अभिनय सोडून कॅमेरावूमन झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. लीला फेम वल्लरी विराजणे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.
वल्लरी विराजने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती कॅमेराचं काम करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर अभिनेता प्रसाद लिमयेदेखील तिला मदत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तिचा अभिने सोडून कॅमेरा हँडल करत आहे आणि या तिचं आवडीचं काम असल्याचे तिने म्हटलं आहे. या व्हिडीओसह तिने असं म्हटलं आहे की, “मला माझ्या कामाशिवाय इतर सर्व कामे करण्यातच अधिक रस असतो”. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा – “त्या बाईच्या मनात…”, वर्षा उसगांवकरांना नडणार असल्याचं डीपीचं वक्तव्य, अंकिताने समजावूनही म्हणाला, “त्यांना रडवणार…”
दरम्यान, अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला टीआरपीदेखील चांगला मिळत आहे. मालिकेत राकेशने AJ (अभिराम जहागीरदार)ची भूमिका साकारली असून वल्लरीने लीला भूमिका निभावली आहे. वल्लरीने याआधी हिंदीतील मालिका, चित्रपटात काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘कन्नी’ मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.