बॉलिवूड सेलिब्रिटी कपल रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचं समोर आल्यापासून साऱ्यांची उत्सुकता वाढून राहिली आहे. ‘तुझे मेरी कसम’ या रोमँटिक चित्रपटातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता त्यांचा हा चित्रपट १३ सप्टेंबरला पुन्हा चित्रपट गृहांमध्ये दाखल होणार असल्याचं समोर आलं आहे. रितेश देशमुख व जेनेलियाच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. त्यांच्या चाहत्यांना या दोघांना पडद्यावर एकत्र पाहायचे होते त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. (Riteish and Genelia Deshmukh New Movie)
रितेश व जिनिलिया यांची प्रेमकथा असलेला हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अलीकडेच रितेशने सांगितले की, “‘तुझे मेरी कसम’ पुन्हा थिएटरमध्ये येत आहे याचा मला खूप आनंद आहे. हा चित्रपट केवळ माझा पहिलाच चित्रपट नाही तर माझ्या आयुष्यातील एका सुंदर गोष्टीची सुरुवातही आहे. त्या सुरुवातीच्या दिवसांना पुन्हा भेटण्यासाठी आणि ते खास क्षण आमच्या चाहत्यांसह पुन्हा शेअर करण्यास खूप छान वाटत आहे. आता पुन्हा १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात भेटू”.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर भारतात परतली हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची बायको, मुलाला ठेवलं सासरी, पुन्हा पॅचअप?
‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मल्याळम चित्रपट ‘निराम’चा रिमेक आहे. या चित्रपटादरम्यान रितेश व जिनिलिया पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. जिनिलियाने सांगितले की, हा चित्रपट आजही तिच्यासाठी खास का आहे?. ती म्हणाली, “या चित्रपटाचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण चित्रपट इंडस्ट्री व रितेशबरोबर माझा प्रवास सुरु झाला. या प्रेमकथेची जादू चाहत्यांबरोबर पुन्हा अनुभवायला मी खूप उत्सुक आहे”.
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश व जिनिलियाने २०१२ मध्ये मराठी परंपरेनुसार लग्न केले. यानंतर या हिट जोडप्याने ख्रिश्चन परंपरेनुसार एकमेकांशी लग्नही केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर, २०१४ मध्ये त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव रियान आहे. यानंतर त्यांनी २०१६ मध्ये त्यांचा दुसरा मुलगा राहिलचे स्वागत केले.