Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सध्या सहावा आठवडा सुरु आहे. गेल्या आठडव्यात या घरात अनेक घडामोडी झाल्या. ‘बिग बॉस’ने मानकापाच्या टास्कसाठी घरातील सर्व सदस्यांना जोडीच्या बंधनात राहायला सांगितले आणि यावेळी अभिजीत व निक्की यांची जोडी चांगलीच गाजली. या जोडीमुळे काहींच्या मनात संशय निर्माण झाला होता तर काहींना यांची मैत्री खटकत होती. या दरम्यान अरबाजचा रुद्रावतारदेखील पाहायला मिळाला. निक्कीला अभिजीतबरोबर पाहून अरबाजला त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि यामुळे त्याने घरात आदळाआपटही केली होती. मात्र ‘भाऊचा धक्क्या’वर रितेशने या सर्व जोड्यांना बंधनमुक्त केलं. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
पाचवा आठवड्यात अरबाज व निक्की यांच्यात अनेक कारणावरुन वाद झाले. अभिजीत व निक्की यांची एक टीम पाहवत नव्हती त्यामुळे त्याची सतत चिडचिड चालू होती. मात्र आठवड्याच्या शेवटी दोघांमध्ये जवळीकता पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांची माफी मागत पुन्हा मैत्री केली. मध्यरात्री अरबाज निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्येही दिसला होता. यानंतर बाथरूम एरियामध्ये दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि अखेर हे दोघे एकत्र आले आहेत. अशातच आजच्या भागात या दोघांमध्ये अभिजीतवरुन संवाद होणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की अरबाजला त्याचे अभिजीतबरोबरचे संबंध संपल्याचे सांगणार आहे. अरबाज व निक्की घरातील लिव्हिंग एरियामध्ये एकमेकांशी बोलत असताना अभिजीतबद्दल संवाद होतो. या संवादात निक्की अरबाजला असं म्हणते की, “मी तुला आता एक गोष्ट सांगते. मी आणि अभिजीत आता एकमेकांच्या विरुद्ध आहोत. त्यामुळे आता तू त्याला काही बोलायचं असेलं तर बोलू शकतोस. मी त्याला स्माईल वगैरे देते. पण ते ठीक आहे. पण आता आम्ही दोघे एकेमकांच्याविरुद्ध आहोत. त्यामुळे आता आमचा गेमही एकमेकांच्या विरुद्ध आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने अरबाजला वैभव विरोधात भडकवलं, मित्रांमध्ये फूट, म्हणाली, “तुझ्यावर तो जळतो आणि…”
‘बिग बॉस मराठी’चा हा सहावा आठवडा फारच कठीण असणार आहे. सहाव्या आठवड्यात सर्वांना BB फार्मचा टास्क देण्यात आला आहे. त्यामुळे आता टास्क मध्ये कोण कुणाला किती भारी पडणार? कुणाच्या डेअरीमध्ये अधिक दूध जमा होणार? यामुळे कुणाला अधिक BB करन्सी मिळणार? हे टास्कच्या अंती पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सदस्यांना BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.