मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हार्दिक पांड्या-रोहित शर्माच्या वादात नवज्योतसिंग सिद्धू यांची उडी, म्हणाले, “रोहित शर्मा कर्णधार नाही पण…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 3, 2024 | 3:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Rohit Sharma Hardik Pandya

Rohit Sharma Hardik Pandya

मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या आयपीएल हंगामात हवी तशी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरताना दिसतोय. पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला मोठया पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा या हंगामातील पुढील मार्ग आणखी खडतर होणार असल्याचं दिसतंय. चाहत्यांकडून मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडलं जात असताना आता माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धूयांनी देखील या चर्चेत उडी मारली आहे. नवज्योत सिंग सिद्धूच्या नवीन वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. (Rohit Sharma Hardik Pandya)

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील कर्णधारपदाची रस्सीखेच आणि मुंबई संघाची कामगिरी याबद्दल नवज्योत यांनी नवीन वक्तव्य केलं आहे. नवज्योत म्हणाले,” भारताचा हिरो, भारताचा कर्णधार आपल्या फ्रेंचायजीचा कर्णधार नाही ही गोष्ट कोणालाही सहन होणारी नाही. रोहित शर्माची नक्की काय चूक आहे?”. तसेच हार्दिक पांड्याची बाजू घेत नवज्योत म्हणाले “हार्दिक पांड्याची तरी यामध्ये काय चूक आहे? जर त्याच्या नेतृत्वाखाली मागचे सामने मुंबई जिंकली असती तर त्याला कोणीही कर्णधार पदाबद्दल प्रश्न विचारले नसते”. वानखेडेवरील सामन्या दरम्यान टॉस प्रसंगी हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीवर चाहत्यांनी दिलेल्या घोषणाविरोधात संजय मांजरेकर यांनी देखील चाहत्यांना नीट वागण्याचा सल्ला दिला.

Navjot singh siddhu speaks#navjotsinghsidhu #sport pic.twitter.com/BXJO8Uywh9

— RVCJ Sports (@RVCJ_Sports) April 2, 2024

आणखी वाचा- “आलिया व माझं धार्मिक कनेक्शन आणि…”, कंगना रणौतला सुनावत रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “विनाकारण तिला…”

रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर हार्दिक पांड्याला सर्वत्र ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यामुळे रोहित व हार्दिक यांच्यामध्ये देखील काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण राजस्थान विरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याला टार्गेट केल्यानंतर रोहितने चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावरून या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला. चाहत्यांनी हार्दिक पांड्याला विरोध केल्यानंतर अनेक खेळाडू मात्र हार्दिकच्या समर्थनार्थ उभे राहताना दिसतायत. (Rohit Sharma Hardik Pandya)

आणखी वाचा- Video : तैवानमध्ये जीवघेणा भूकंप, इमारती कोसळल्या, रस्तेही उरले नाहीत अन्…; त्सुनामीचाही इशारा, हृदय पिळवटून टाकणारी दृश्य समोर

आता आगामी सामन्यात मुंबईच्या कर्णधारपदामध्ये बदल होणार का?, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला विजय मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. मुंबईचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर असून दिल्लीचा संघ देखील यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे.

Tags: IPL 2024mumbai indiansnavjyot singh siddhuRohit Sharma Hardik Pandya
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Where is Rita Riporter

कुठे गायब झाली 'तारक मेहता…'ची रिटा रिपोर्टर?, लग्न झाल्यानंतर संसारात अडकली अन्…; आता दिसते अशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.