गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुठे गायब झाली ‘तारक मेहता…’ची रिटा रिपोर्टर?, लग्न झाल्यानंतर संसारात अडकली अन्…; आता दिसते अशी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 3, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Where is Rita Riporter

कुठे गायब झाली 'तारक मेहता...'ची रिटा रिपोर्टर?, लग्न झाल्यानंतर संसारात अडकली अन्...; आता दिसते अशी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे जगभरात लाखो चाहते आहेत. आजवर या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली असून गेली वर्ष ही मालिका सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकाबरोबरचं मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका आणखीनच लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील पात्रांचे स्वतःचे असे वेगळे स्थान आहे. त्यापैकी एक म्हणजे रिटा रिपोर्टर. रीटा रिपोर्टर आजकाल मालिकेत फार क्वचितच दिसत असली तरी, एक काळ असा होता की तिच्याभोवती एपिसोड फिरताना दिसायचा. (Where is Rita Riporter)

रीटा रिपोर्टरचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा अभिनेत्री प्रिया आहुजाचे नाव डोळ्यासमोर येते. कारण प्रियाने बराच काळ रीटाची भूमिका केली होती. मात्र, यादरम्यान काही काळ अभिनेत्री मिहिका वर्मानेही रिटा रिपोर्टरची भूमिका साकारुन चाहत्यांना भुरळ घातली. मिहिका ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. मात्र, सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर असल्याचं पाहायला मिळतंय.

आणखी वाचा – “आलिया व माझं धार्मिक कनेक्शन आणि…”, कंगना रणौतला सुनावत रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “विनाकारण तिला…”

View this post on Instagram

A post shared by Mihika Kapai (@mihikavarma1)

मिहिका सध्या वैवाहिक आयुष्य जगण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. तिने २०१६ मध्ये आनंद कपईशी लग्न केले आणि लग्नानंतर ती परदेशात गेली. अभिनेत्रीने तिची अभिनय कारकीर्द मध्यंतरी सोडली आणि पती आनंद कपई यांच्याबरोबर परदेशात गेली. त्यानंतर अभिनेत्री मातृत्वाचा आनंद घेताना दिसली. अभिनेत्री एका मुलाची आई आहे. ती जेव्हा इंडस्ट्रीत होती तेव्हा ती सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह दिसली. मात्र सध्या सोशल मीडियावर तिची उपस्थिती नगण्य आहे.

आणखी वाचा – “प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते”, ‘नाच गं घुमा’चा भन्नाट टीझर प्रदर्शित, छोट्या मायरासह नम्रता संभेराव व मुक्ता बर्वेचा लक्षवेधी अंदाज

परदेशात स्थायिक झाल्यानंतर आणि अभिनय सोडल्यानंतर अभिनेत्रीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. तिने एमबीएचे शिक्षण घेतले. मात्र, तिची एमबीएची परीक्षा असताना ती गरोदर होती. पण त्याचा अभ्यासावर तिने परिणाम होऊ दिला नाही. मिहिकाने २००४ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. अभिनेत्रीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तिने २००४ मध्ये अभिनयास सुरुवात केली. ‘गेट गॉर्जियस’ या शोमध्ये ती दिसली होती. ‘कितनी मोहब्बत है’, ‘तुझे संग प्रीत लागी सजना’, ‘किस देश में है मेरा दिल’, ‘बात हमारी पक्की है’, ‘ये है आशिकी’, ‘इतना करो ना मुझे प्यार’ असे अनेक शो तिने केले. ‘ये है मोहब्बतें’ या शोमधून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये ती मिहिका नावाची व्यक्तिरेखा साकारत होती. या शोमधून बाहेर पडताच तिने लग्न केले.

Tags: entertainment newsknow about rita reporterTaarak mehata ka ooltah chashamahWhere is Rita Riporter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Celebrity chef Kunal Kapur divorced with his wife after 16 years of marriage see the details

बायकोकडूनच मानसिक छळ, पैशांची मागणी अन्...; वैवाहिक आयुष्याला कंटाळून प्रसिद्ध शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट, १६ वर्षांनंतर मोडला संसार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.