शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तिच्या बाळाचं…”, अंकिता लोखंडेच्या गरोदरपणाबाबत ‘बिग बॉस १७’मधून बाहेर पडलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा, म्हणाला, “तिने मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 5:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
navid sole evicted from bigg boss 17 and he is talked about her journey and ankita lokhande pregnancy

"तिच्या बाळाचं...", अंकिता लोखंडेच्या गरोदरपणाबाबत 'बिग बॉस १७'मधून बाहेर पडलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा, म्हणाला, "तिने मला..."

‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. नवनवीन ट्विस्टसमुळे हा शो उत्कंठावर्धक होत चालला आहे. अशातच आता या शोमध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. ते म्हणजे घरातील एक सदस्य बाहेर पडला आहे. गेल्या आठवड्यात या शोमधून एकही सदस्य बाहेर पडला नव्हता. मात्र या आठवड्याच्या मध्यावरच एक सदस्य घरातून बाहेर पडणार आहे. (Navid Sole Talked About Ankita Lokhande’s Pregnancy)

स्पर्धक नावीद सोले हा घरातून बाहेर पडल. नावीदला प्रेक्षकांच्या मतांमुळे नव्हे तर त्याच्या सहकारी स्पर्धकांच्या निर्णयामुळे या शोचा निरोप घ्यावा लागला आहे. शोमधून बाहेर पडल्यांनातर नाविदने ‘दैनिक भास्कर’शी साधलेल्या संवादात, त्याच्या ‘बिग बॉस’मधील प्रवासाबद्दल आणि अंकिता लोखंडेच्या गरोदरपणाबद्दल सांगितले.
यावेळी अंकिताबद्दल त्याने असे म्हटले आहे की, “आत्तापर्यंत सर्व काही सकारात्मक दिशेने चालले आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे. अंकिताने मला वचन दिले आहे की, ती तिच्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी माझी मदत घेणार आहे आणि यासाठी आम्ही हिंदी व इंग्रजी नावांवरून काही नावे तयार केली आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर मी ती नावे शेअर करेन.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – अमृता देशमुखच्या मंगळसूत्राच्या डिझाइनची जोरदार चर्चा, तर नवऱ्याने बायकोच्या नावाचं घातलेलं युनिक लॉकेट ठरलं लक्षवेधी

घरातील इतर स्पर्धकांनुसार नावीद हा घरात अजिबात सक्रिय नसल्यामुळे त्याला घराबहेर पडावे लागले. तेव्हा त्याने या सगळ्या अफवा असल्याचे सांगत असे म्हटले की, “मी या शोमध्ये सुरुवातीपासूनच माझी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत ती राखली. मी सक्रिय नसल्याबद्दल ते स्पर्धक अफवा पसरवत आहेत”. यापुढे एलिमिनेशनबद्दल त्याने असे म्हटले की, “जे सक्रिय नाहीत ते अजूनही घरात आहेत. मी खूप सक्रिय असून घरातील प्रत्येक कार्यात सहभाग घेत होतो. मी घरात खूप सकारात्मकता पसरवली. कदाचित याच कारणामुळे मला बाहेर काढण्यात आले. मी घरातून बाहेर पडलो तेव्हा घरातील काही लोक माझ्यासाठी रडत होते”.

आणखी वाचा – मराठमोळ्या प्रिया बापटची बॉलिवूड चित्रपटात धमाकेदार एन्ट्री! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासह स्क्रीन शेअर करणार

यापुढे विकी जैन हा घरातील सर्वात चांगला स्पर्धक असल्याचेही त्याने सांगितले. विकीबद्दल तो असं म्हणाला की, “विकी खूप छान खेळत आहे. तो सहजासहजी भावूक होत नाही. पण नुकतेच त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून मलाही भरून आले. त्याचा हुशारपणा त्याला शेवटपर्यंत घेऊन जाईल असा मला विश्वास आहे”.
दरम्यान नावीदने अंकिताबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या अफवांना दुजोरा मिळत आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनादेखील तिच्याविषयी उत्सुकता लागली आहे. त्यामुळे येत्या भागात ‘बिग बॉस’मध्ये आणखी काय काय बघयला मिळणार यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Tags: ankita lokhandebigg boss 17bollywood newsentertainment newsvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
munawar faruqui get called out as fake by nazila

Bigg boss 17: मन्नारा चोप्राबरोबर जोडलं जातंय मुनव्वर फारुकीचं नाव, गर्लफ्रेंडने पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “सगळंच खरं असतं असं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.