भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट होणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. हार्दिक व नताशा दोघेही यावर मौन बाळगून आहेत. पण नताशा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असते. यावेळी तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधले. (Natasha Stankovic latest Instagram Story)
नताशा स्टॅनकोविक लाइमलाइटपासून दूर राहत असली तरी ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने जे नेहमी इतरांबद्दल भाष्य करतात त्यांच्यावर टीका केली आहे. नताशा स्टॅनकोविक इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. पोस्टद्वारे नताशाने तिच्या मनात आलेला विचार शेअर केला, ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे.
नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कॉफी पिताना बोलत आहे. नताशा म्हणाली, “मी कॉफी पित असताना माझ्या मनात विचार आला की, “जेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा विचार केला जातो तेव्हा लोक त्या विचाराला स्वतःच्या आयुष्यात आत्मसात करतात”. नताशा पुढे म्हणाली, “आजूबाजूला कोणी वेगळे वागत असेल आणि ते दिसण्यात आलं तर कोणी त्यासाठी थांबत नाही आणि त्याचा विचारही करत नाही, उलट त्यांच्याबद्दल त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात. ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, त्या क्षणी त्या व्यक्तीबरोबर काय सुरु आहे, त्यांच्या मनात काय चालले आहे हेदेखील पाहत नाही. म्हणून मला सांगायचे आहे की, थोडे कमी निर्णय घया. धीर धरा आणि त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूती दाखवा”.
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या खूप चर्चेत होता, त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती पण त्याची पत्नी नताशाने त्याचे अभिनंदन केले नाही. नताशा यामुळेही ट्रोल झाली होती, मात्र हार्दिकबरोबर तिचे संबंध चांगले नसल्याच्या अफवा आधीच पसरल्या आहेत. यावर सध्या नताशा किंवा हार्दिक यांनी काहीही भाष्य केले नाही.