‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम आणि श्रीकांतच्या सांगण्यावरुन अहिल्यादेवींची भूमिका साकारायची म्हणून पारू तयार होऊन खाली येते. तेव्हा पारू घाबरून बसलेली असते. प्रीतम तिला सांगतो की, देवीआई कशी बसते, ती कशी वागते तसं वाग. यावर पारू अगदी सेम टू सेम अहिल्यादेवीसारखं वागू लागते. तिला पाहून प्रश्न विचारायला आलेल्या माणसाचं लक्ष विचलित होतं आणि तो घाबरतो. पारुच्या नजरेला नजर द्यायला ही त्याला भीती वाटू लागते. तेव्हा प्रीतम त्याची समजूत काढतो मात्र तो पूर्णतः घाबरलेला असतो त्याच वेळेला अहिल्यादेवींची गाडी येते. (Paaru serial Update)
अहिल्यादेवी घरात येतात तेव्हा सगळे बसलेले असतात. त्या विचारतात इथे काय सुरु आहे. तेव्हा श्रीकांत सांगतो की, नवीन क्लाइंट आले आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं करत आहोत. त्याच वेळेला त्या पारुलाही विचारतात तर पारूअहिल्यादेवी घरात यायच्या आत कपडे वगैरे बदलून तयार होते आणि त्या अहिल्यादेवी पारूला कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये बोलवतात. त्याच वेळेला प्रिया श्रीकांतला एक आयडिया सुचवते आणि आर जे श्रुती ज्या खूप मुलाखती घेतात त्यांच्याबद्दल सांगते आणि त्यांना मुलाखतीसाठी कन्व्हेन्स करते.
तर त्याच दिवशी अहिल्यादेवी झोपलेल्या असतात तेव्हा आदित्य अहिल्यादेवींच्या खोलीत येतो आणि त्यांना पाहून खूपच भावुक होतो. तर दुसऱ्या दिवशी अहिल्यादेवी सावित्रीला विचारतात आज माझं शेड्युल काय आहे तेव्हा सावित्री सांगते की सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या आहेत. तुमची एक इम्पॉर्टंट मुलाखत आहे. यावर मुलाखत द्यायला अहिल्यादेवी नकार देतात. तेव्हा श्रीकांत त्यांची समजूत काढतात. तर दिशाला इकडे खटकतं की या मुलाखतीबद्दल मला कसं माहित नाही असं म्हणून ती विचार करु लागते. त्याच वेळेला श्रीकांत अहिल्यादेवींच्या हातात एक साडी देतात आणि सांगतात की तू ही साडी नेसावी अशी माझी इच्छा आहे.
यावर अहिल्यादेवी श्रीकांतवर रागावतात. श्रीकांत इथून निघून गेल्यानंतर अहिल्यादेवी आदित्यने दिलेल्या त्या साडीच्या आठवणीत रमतात. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी व आदित्य एकमेकांसमोर येणार का?, एकमेकांना विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.